Breaking
ब्रेकिंग

0 7 6 9 4 7

डॉ. महेश भोसले व डॉ. अपर्णा भोसले यांनी सातारा हिल हाफ मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण

प्रतिनिधी: सूर्यकांत होनप

करमाळा: दि. १५/ करमाळा येथील डॉ. महेश भोसले व डॉ. अपर्णा भोसले यांनी सातारा हिल हाफ मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केली. असे करणारी ही करमाळा मधील पहिली वैद्यकीय दाम्पत्य जोडी आहे.

भारताच्या तीन प्रमुख मॅरेथॉन शर्यतींपैकी एक मानली जाणारी सातारा हिल हाफ मॅरेथॉन यावर्षी उत्साहवर्धक वातावरणात पार पडली. या आव्हानात्मक शर्यतीत डॉ. महेश भोसले (अस्थिरोगतज्ञ) व डॉ. अपर्णा भोसले यांनी यशस्वीरीत्या संपूर्ण अंतर पूर्ण केले. डोंगराळ मार्ग आणि कठीण चढ-उतार असलेल्या या स्पर्धेत दोघांनी शिस्त, जिद्द आणि सातत्यपूर्ण तयारीच्या जोरावर हे यश संपादन केले. महत्त्वाचे म्हणजे सातारा हिल हाफ मॅरेथॉन पूर्ण करणारी ही करमाळा मधील पहिली दाम्पत्य जोडी ठरली आहे.

त्यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, निरोगी जीवनशैली व फिटनेसप्रती त्यांची बांधिलकी करमाळ्यासह संपूर्ण परिसरासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

4/5 - (2 votes)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे