आडसूळ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय यश

आडसूळ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय यश
एस डब्ल्यू न्यूज / नेटवर्क
चास येथील सौ.सुंदरबाई माणिक आडसूळ पॉलिटेक्निक या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षण पद्धतीची अंमलबजावणी केलीच जाते त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे व टेक्निकल स्किल विद्यार्थ्यांमध्ये आत्मसात झाले पाहिजे यासाठी महाविद्यालयामध्ये व त्याचबरोबर इतर महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते अशी माहिती प्राचार्य आर एस गडाख यांनी दिली. त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय पोस्टर प्रेझेंटेशन आणि प्रोजेक्ट स्पर्धेत सहभाग नोंदवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यस्तरीय इनोव्हिजन २०२५ या स्पर्धेचे आयोजन एस पी आय टी कुरुंद पॉलिटेक्निक पारनेर यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
स्पर्धेत विविध पॉलिटेक्निक महाविद्यालयांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थी या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाले होते. सौ.सुंदराबाई माणिक आडसूळ पॉलिटेक्निक कॉलेजच्या स्थापत्य विभागातील तृतीय वर्षात शिकणाऱ्या प्रतिक्षा शशिकांत चोरमागे हिने स्मार्ट पॅव्हमेंट या विषयावर उत्कृष्ट सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला आणि संगणक विभागातील द्वितीय वर्षात शिकणारे सर्वेश मिलिंद कदम, भोजने गायत्री आणि भावसार पायल यांनी ए.आय कंट्रोल प्रोग्राम या विषयावरती सादरीकरण करून कन्सुलेटेड बक्षीस मिळवले.दृष्टिकोन व नाविन्यपूर्ण माहिती त्यांनी सादर केली. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपले ज्ञान व संशोधन क्षमता सादर करण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांना पोस्टर बनवण्यासाठी सर्व प्राध्यापकांनी विशेष प्रयत्न केले.
या यशाबद्दल संपूर्ण महाविद्यालयात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री अनिरुद्धजी आडसूळ, सेक्रेटरी सौ. लीना आडसूळ, खजिनदार मा. श्री. परमेश्वर आडसूळ, संचालक मा. कृष्णा आडसूळ, प्राचार्य व डायरेक्टर डॉ. प्रदीप पाटील व डॉ. संभाजी पठारे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य रमेश गडाख, फार्मसीचे प्राचार्य डॉ. धनंजय लांडगे व डॉ. संदेश वायाळ आणि डॉ. पंडित प्रदीप, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी विजेते व सहभागी विद्यार्थ्यांसाठी अभिनंदनाचा वर्षाव आनंदाचा वर्षाव करून त्यांचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.