Breaking
ब्रेकिंग

सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

0 3 9 0 2 6

सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

एस डब्ल्यू न्यूज /  वृत्तसेवा :  जावेद शेख

सावित्रीबाई फुले प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अखंड भारत देशाचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.तुपविहीरे सर होते.व्यासपीठावर उपमुख्याध्यापक श्री. डोंगरे सर, श्री.जाधव सर,आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे व प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराजांची सामूहिक आरती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी भगवे फेटे परिधान करून पारंपरिक वेशभूषा केली होती. विद्यार्थीनी यांनी सध्याच्या पिढीला उपयुक्त असे प्रबोधनपर विचार मांडून सर्वांची मने जिंकली. यावेळी विद्यार्थ्यांनी शिवकालीन कसरतीचे खेळ करून दाखविले. महाराज यांच्या जीवन व कार्याविषयी विद्यालयातील शिक्षकांसह विद्यार्थी यांनी महाराजांचे कर्तृत्व विद्यार्थ्यांना विशद केले. जीवनात आई ,वडील व गुरू यांना विसरू नका. शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे तुपविहिरे सर यांनी केले आदींसह शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी व सावित्रीबाई फुले विद्यालयातील सुरक्षारक्षक (होमगार्ड) श्री.भरत नजन उपस्थित होते .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे