Breaking
ब्रेकिंग

ग्रामीण पत्रकार संघ व नमो बहुउद्देशीय संस्थेचा उल्लेखनीय उपक्रम

जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण संपन्न

0 3 9 0 4 0

ग्रामीण पत्रकार संघ व नमो बहुउद्देशीय संस्थेचा उल्लेखनीय उपक्रम

 जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण संपन्न

प्रतिनिधी : संवेद वायकर

५ जुन या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र वाळकी, ता. नगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला.नमो बहुउद्देशीय संस्था व ग्रामिण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन केले होते. वड , पिंपळ , चिंच अशा विविध प्रकारच्या ४० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले .

आतापर्यंत संस्थेच्या माध्यमातून दोन हजारहून अधिक झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले असून संस्थेच्या वतीने भविष्यात एकूण दहा हजार झाडे लावण्याचा मानस असल्याचे शिरीष बेगडे यांनी यावेळी बोलताना सांगितले .

याप्रसंगी नमो बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व पत्रकार संजय वायकर, पत्रकार आसावरी वायकर, संस्थेचे मार्गदर्शक सेनि पि . आय . शिरीष बेगडे, अरुण बेगडे, संस्थेच्या सचिव पुनम कानडे ,स्वामी सेवा केंद्राचे डाॅ. संतोष भापकर, वंदना ठोकळ, गौरव सारबंदे व स्टाफ उपस्थित होता.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे