Breaking
ब्रेकिंग

सभासद कामगार व भावी पिढीच्या हितासाठी बिनविरोध निवडणूक करा- – सुरेशराव लांबे पाटील

0 3 9 0 8 0

सभासद कामगार व भावी पिढीच्या हितासाठी बिनविरोध निवडणूक करा- – सुरेशराव लांबे पाटील

राहुरी तालुका जावेद शेख

डॉ तनपुरे सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून अनेक मंडळांनी कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे,याआधी सभासदांनी ज्या ज्या मंडळाला संधी दिली त्यांना कारखाना चालवण्यात यश आले नाही.त्यांनी या निवडणुकीमध्ये मनाचा मोठेपणा दाखवून शेतकरी कामगार व व्यापारी यांचे व भावी पिढीचे हित डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक बिनविरोध करावी व कारखाना सुरळीत चालवावा यासाठी आमचेही सहकार्य राहील असे मत प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुका अध्यक्ष व शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी व्यक्त केले.

पुढे माध्यमांशी बोलताना लांबे पाटील म्हणाले कारखान्याचे व सभासदांचे अस्तित्व कायम रहावे यासाठी कारखाना बचाव कृती समितीने वेळोवेळी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या.कारखाना सभासदांच्या मालकीचा राहिला पाहिजे.संलग्न शिक्षण संस्था व जमिनी विक्री न करता कारखाना पूर्ववत चालू झाला पाहिजे. यासाठी कारखाना बचाव कृती समिती आजही आग्रही आहे.
जिल्हा बँकेतर्फे कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी चार वेळा निविदा प्रक्रिया राबविणारांची,केंद्रात व राज्यात सत्ता असताना ते कारखाना चालविण्यात अपयशी ठरले आहे.तरीही ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत.मी अनेक वेळा कारखाना निवडणुकीत तिसरा पॅनल उभा करुन सभासदांना पर्याय दिला परंतु आमच्या पॅनलचा फायदा इतरांनाच होत गेला त्यावेळची कारखान्याची परिस्थिती वेगळी होती.आजही आम्ही पॅनल तयार करू शकतो परंतु सध्याच्या परिस्थितीचा विचार करून कारखाना निवडणूक बिनविरोध होण्याची गरज आहे यासाठी आमचे प्रयत्न व सहकार्य राहणार असून बिनविरोधसाठी सर्वांनी सहकार्य करावे व कारखान्याला गत वैभव प्राप्त करून शेतकरी कामगार व व्यापारी व भावीपदीचे हित पहावे अशी अपेक्षा सर्व मंडळाकडून राहुरी तालुक्यातील शेतकरी नेते सुरेशराव पाटील यांनी व्यक्त केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे