पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सुरक्षा ताफ्यात महिला कमांडो
महिला कमांडोचा फोटो व्हायरल
एस डब्ल्यु न्यूज रिपोर्ट
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सुरक्षा ताफ्यातील महिला कमांडोचा सदर फोटो प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार असणाऱ्या कंगना रणौत यांनी स्टेटसला ठेवला. ज्यानंतर या महिला कमांडोचा फोटो व्हायरल झाला आहे.
अनेक भाजपा नेत्यांनी त्यांच्या एक्स पोस्टवर हा फोटो पोस्ट केला आणि महिला शक्तीचं उत्तम उदाहरण हे मोदींनी दाखवून दिल्याचा उल्लेख केला आहे. तसंच अनेकांनी महिला कमांडो पहिल्यांदाच मोदी यांच्या ताफ्यात दिसली आहे हे चित्र सकारात्मक आहे अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही महिला कमांडो एसपीजी कमांडो असण्याची शक्यता वर्तविली जात आहे . पंतप्रधान नरेंद्रजी मोदींचा हा फोटो संसदेच्या परिसरातला आहे. संसदेच्या परिसरात महिला एसपीजी कमांडो तैनात असतात.