Breaking
ब्रेकिंग

तक्रार निवारण समितीत प्राध्यापकांच्या समस्या ऐरणीवर

0 3 9 0 6 1

तक्रार निवारण समितीत प्राध्यापकांच्या समस्या ऐरणीवर

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

जळगाव :- नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार मा. सत्यजित दादा तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव येथे तक्रार निवारण समितीची बैठक पार पडली. या बैठकीत ज्युनिअर कॉलेज प्राध्यापकांच्या विविध अडचणींवर ठोस चर्चा करण्यात आली.बैठकीत प्रा. डॉ. संदीप पाटील, ज्युनिअर कॉलेज संघटनेचे अध्यक्ष नंदनवडीकर, कार्याध्यक्ष शैलेश राणे, उपाध्यक्ष अतुल इंगळे आणि पारोळा तालुका अध्यक्ष प्रा. शशिकांत पाटील यांनी सहभाग घेतला. त्यांनी कायम मान्यता, एनपीएस (नवीन पेन्शन योजना), वैद्यकीय खर्चाची परिपूर्ती यांसारख्या विषयांची मुद्देसूद मांडणी केली.शिक्षण विभागाच्या प्रतिनिधींनी सदर प्रश्न गांभीर्याने ऐकून घेतले असून, संबंधित बाबींवर कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले. या उपक्रमामुळे ज्युनिअर कॉलेज प्राध्यापकांचे प्रश्न अधिकृत व्यासपीठावर पोहोचले असून, त्यावर लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे