Breaking
ब्रेकिंग

महायुतीला अभूतपूर्व यश मिळाल्याबद्दल करमाळा येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला

0 3 9 0 5 0

महायुतीला अभूतपूर्व यश मिळाल्याबद्दल करमाळा येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप:

करमाळा: दि. २४/ विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप महायुतीला अभूतपूर्व असे यश मिळाल्याबद्दल करमाळा तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करमाळ्यातील सुभाष चौक येथे फटाक्यांची आतिषबाजी करत मोठ्या जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला.

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेले अभतपूर्व यश म्हणज जनतेने विकासाला प्राधान्य दिले असे यामधून दिसून येते असे मत संजय घोरपडे यांनी सुभाष चौक येथे राज्यात महायुतीची सत्ता आल्याबद्दल जल्लोष करताना व्यक्त केले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने ढोल ताशा, फटाके व पेढे वाटून गुलाल उधळून आनंद साजरा केला. पुढे बोलताना ते म्हणाले की करमळा येथील महायुतीचे उमेदवार श्री दिग्विजय बागल यांनीही कमी कालावधीमध्ये चांगली लढत देऊन मोठ्या प्रमाणात मते मिळवलेली आहेत ही बाबी ही उल्लेखनीय आहे. पुढील काळामध्ये ही भाजपाचे कार्यकर्ते संघटना असो या येणाऱ्या निवडणुका असो एक दिलाने काम करतील. करमाळा शहर व तालुक्यामधील विकास कामे भाजप सरकारच्या काळामध्ये निश्चितपणे सोडण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी सचिन चव्हाण, किरण बोकन, श्याम सिंधी, शशिकांत पवार, आदेश कांबळे, जितेश कटारिया, नरेंद्रसिंह ठाकुर, विजयकुमार नागवडे, डॉ. कुलकर्णी, नानासाहेब मोरे शेटफळ, अ़ॅ. सुहास कानगुडे, दिनेश मडके, मनोज कुलकर्णी, संतोष कांबळे, रेणुका राऊत, सौ. सुप्रिया कांबळे, भाग्यश्री कुलकर्णी, नितीन कांबळे, शिवनाथ घोलप, महेश क्षीरसागर, प्रदीप देवी, संतोष दोशी, मुन्ना हसीजा आदी उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 5 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे