Breaking
ब्रेकिंग

श्री कमलाभवानी मंदिर सुधारणा व सुशोभीकरणासाठी पर्यटन विकास आराखड्यांमधून पाच कोटी निधी मंजूर:- माजी आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती

0 7 6 9 4 7

श्री कमलाभवानी मंदिर सुधारणा व सुशोभीकरणासाठी पर्यटन विकास आराखड्यांमधून पाच कोटी निधी मंजूर:- माजी आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ११/ सोलापूर जिल्ह्यात पर्यटनासोबतच आर्थिक विकासास चालना देण्यासाठी शासन निर्णय क्र. तीक्षेवि- २०२४/प्र.क्र. ५९/का. १४४४-अ, दि. ३०/०९/२०२४ अन्वये शासनाकडून रु. २८२.७५ कोटी उजनी जलाशय, जलपर्यटन, धार्मिक, निसर्ग पर्यटन, कृषी पर्यटन, विनयार्ड पर्यटन विकासाच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यास २०२४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मंजुरी मिळाली होती. या पर्यटन विकास आराखड्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनासाठी एकूण २५ कोटी निधीला मंजुरी मिळालेली होती. त्यातील ५ कोटी निधीची कामे करमाळा तालुक्यातील कमला भवानी मंदिर परिसरात केली जाणार आहेत.

सदर कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असल्यामुळे कमलाभवानी मंदिर राज्याच्या, देशाच्या पर्यटन नकाशामध्ये आता झळकेल असा विश्वास माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केला. ५ कोटी निधीपैकी २ कोटी २० लक्ष निधीमधून श्री कमलादेवी मंदिरात सीसीटीव्ही देखरेख प्रणाली, ऑन ग्रिड सोलर रूफ टॉप सिस्टम, स्ट्रीट लाईट आणि हायमास्ट, गार्डन लाईट, विद्युतीकरणाचे काम आणि संगीतमय कारंजे ही कामे केली जाणार आहेत तर २ कोटी ८० लक्ष निधीमधून मंदिर सुधारणेची कामे केली जाणार आहेत.

 

यापूर्वी मिळालेल्या ४ कोटी निधीची कामे पूर्णत्वास.

श्री. कमलाभवानी हे करमाळा तालुक्याचे आराध्य दैवत आहे. हे देवस्थान करमाळा शहराच्या लगत असून या देवस्थानचा विकास करण्यासाठी तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांनी ४ कोटी रुपये निधी मंजूर केला होता. त्या निधीमधून पेविंग ब्लॉक बसविणे – २४ लाख, सर्व रस्ते सिमेंट काँक्रीट करणे – ७६ लाख, रस्ते डांबरीकरण करणे – ४७ लाख, भक्तनिवास बांधणे – ८० लाख, महिला व पुरुषांच्या साठी स्वच्छतागृह बांधणे – २१ लाख ५० हजार, वॉल कंपाऊंड बांधणे १ कोटी ४३ लाख, स्ट्रीट लाईट बसविणे – १५ लाख ही कामे पूर्ण झालेली आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे