निर्माण बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने पळसनाथ विद्यालय पळसदेव येथे जागतिक महिला हिंसाचार विरोधी पंधरवडा . .
निर्माण बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने पळसनाथ विद्यालय पळसदेव येथे जागतिक महिला हिंसाचार विरोधी पंधरवडा . .
इंदापूर / प्रतिनिधी
इंदापूर : दि २५ नोव्हेंबर हा दिवस जागतिक महिला हिंसाचार निर्मूलन दिवस म्हणून साजरा पळसनाथ विद्यालय पळसदेव येथे करण्यात येत असून निर्माण संस्थेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात महिला आणि मुलींसह बालकांवर होणाऱ्या हिंसा रोखण्यासाठी प्रतिबंध, प्रतिसाद, पुनर्वसन आणि सुधारणा या चार टप्प्यांवर गावपातळीवर काम केले जात आहे . गेल्या काही वर्षात मुलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. सर्वांसाठी एक सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था कटीबद्ध असल्याचे तसेच बाल मजुरी, बाल विवाह, विधीसंघर्षग्रस्त मुलांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पालक आणि मुलांमध्ये सातत्याने एक तणाव निर्माण होताना दिसतोय. मुलांवर होणारे शारीरिक व लैंगिक शोषण चे प्रमाण वाढत आहे. छेडछाड, व्यसनाधीनता सारख्या समस्या दिसून येतात, तसेच मुलांसोबतची क्रूर वागणूक म्हणजे मुलांना मारहाण करणे, दरवर्षी जागतिक महिला हिंसाचार विरोधी पंधरवडाच्या निमित्ताने १६ दिवस निर्माण संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गेल्या ७ वर्षापासून पुणे जिल्ह्यात हे १६ दिवसाचे अभियान राबवत आहोत. या वर्षाची थीम आहे,”महिला आणि मुलींवरील हिंसाचार संपवण्यासाठी संघटित व्हा” या थीमला घेऊन २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२४ रोजी हे अभियान राबवण्यात येत आहे. त्यामध्ये जनजागृतीपर कार्यक्रम, फिल्म शो, पोस्टर प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य सादरीकरण, प्रशिक्षण, चर्चासत्र, रैली इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करत असल्याची माहिती निर्माण संस्थेने रवी पवार यांनी दिली.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य पाठक सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच निर्माण संस्थेचे रवी पवार, किरण यादव , माधुरी खैरकर मॅडम व इतर प्रतिनिधी उपस्थित होते.