ग्रामीण पत्रकार संघ व नमो बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचा सत्कार

ग्रामीण पत्रकार संघ व नमो बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचा सत्कार
प्रतिनिधी : संवेद वायकर
जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचा रिटायर्ड पी . आय .श्री . शिरिष बेगडे, ग्रामीण पत्रकार संघ आणि नमो बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार संजय वायकर यांनी सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी भंडारी यांना एक झाडाचे रोप भेट देण्यात आले .
आनंदजी भंडारी हे पुणे येथील रहिवासी आहेत. ते यापूर्वी जमावबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, पुणे येथे कार्यरत होते. ग्रामपंचायत प्रशासन, पंचायत राज व्यवस्था सक्षमीकरण, मृद व जलसंधारण, पर्यावरण रक्षण व संवर्धन, स्वच्छ भारत अभियान, प्रशिक्षण व क्षमता बांधणी, विविध विकास योजनांची अंमलबजावणी, शासनाच्या विविध अभियानांची अंमलबजावणी आदी क्षेत्रात भंडारी यांनी भरीव काम केले आहे. भंडारी यांना २०१८ मध्ये ग्रामविकास विभागाचा ‘गुणवंत अधिकारी पुरस्कार’ देऊन राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आले होते.
त्यांना पुढील वाटचालीसाठी रिटायर्ड पी . आय . शिरीषजी बेगडे यांनी ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य व नमो बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला.