इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर वेल्फेअर असोसिएशन ची सभा संपन्न
इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर वेल्फेअर असोसिएशन ची सभा संपन्न
अलिबाग / प्रतिनिधी : राजेश बाष्टे
रायगड जिल्ह्यातील नामवंत ,इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर वेल्फेअर असोसिएशन पेण रायगड यांची विशेष सर्वसाधारण सभा पेण येथील शिवमुद्रा हाॅटेल येथे नुकतीच संपन्न झाली.
सभेस रायगड जिल्ह्यातील सर्व इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते. सभेच्या सुरूवातीस सचिव भालचंद्र जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत करून सभेची विषयपत्रिका वाचून दाखवली. या प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष निलेश दादा पाटील, सचिव भालचंद्र एन जोशी ,कार्याध्यक्ष राजेश सानप उपस्थित होते.
सभा सुरू झाल्यानंतर राज्य संघटना फेकॅम यांच्या कार्यकारिणीत स्विकृत सदस्य म्हणून निलेश दादा पाटील यांची तसेच कोकण रिजनल मेंबर म्हणून भालचंद्र एन जोशी,तसेच महावितरण तक्रार निवारण समिती सदस्य पदी राजेश सानप यांची ,तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग तक्रार निवारण समिती सदस्य पदी शशिकांत राऊत यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा संघटनेमार्फत सत्कार करण्यात आला. तद्नंतर सांगली येथे महावितरण कंपनी ठेकेदारांचे महाअधिवेशन होणार असून सर्व ठेकेदारांनी उपस्थित रहावे यासाठी अध्यक्ष निलेश दादा पाटील यांनी आवाहन केले.तसेच महावितरण कंपनीत भेडसावणाऱ्या विविध विषयांवर उपस्थित ठेकेदार बंधुनी चर्चा केली. यावेळी पि एन हिरेमठ – उपाध्यक्ष पनवेल डिव्हिजन,अजय सलागरे,यदुराम धुमाळ उपाध्यक्ष रोहा डिव्हिजन, दिनानाथ पाटील उपाध्यक्ष अलिबाग डिव्हिजन,
विजय राजीवले, शत्रुघ्न रणनवरे,क्षितिज जंगम, प्रमोद लोखंडे, गुरूनाथ गाताडे,विकास म्हात्रे,गजानन म्हात्रे, प्रकाश तांडेल, प्रभाकर ठोंबरे,दर्शन पाटील, संतोष पोटे,वसंत म्हात्रे, माने व इतर सदस्य उपस्थित होते.सभेस चांगली उपस्थिती दर्शवली या बद्दल कार्याध्यक्ष राजेश सानप यांनी सभेचे आभार मानले व सभेचा समारोप केला .