चौपाटी कारंजा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ चा १२४ वा कार्यक्रम ऑन स्क्रीन उत्साहात संपन्न

चौपाटी कारंजा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ चा १२४ वा कार्यक्रम ऑन स्क्रीन उत्साहात संपन्न
प्रतिनिधी : संवेद वायकर
प्रभाग क्र. 13 येथे बूथ क्र. 198.,199 येथे भाजपा मध्य मंडल अध्यक्ष मयूर बोचूघोळ यांच्या अध्यक्षते खाली भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा . नरेंद्रजी मोदी यांचा ‘मन की बात’ चा १२४ वा कार्यक्रम ऑन स्क्रीन उत्साहात संपन्न झाला .मन की बात हा कार्यक्रम चौपाटी कारंजा येथील सावरकर चौक येथे स्क्रीनवर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला .
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी आज ‘मन की बात’च्या १२४ व्या कार्यक्रमात अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली. राष्ट्रीय प्रगती आणि सामाजिक उपक्रमांबाबत बोलताना त्यांनी देशभरातील विविध सामाजिक उपक्रम आणि विकासात्मक कार्यांवर प्रकाश टाकला. यामध्ये सामाजिक बदल घडवणाऱ्या स्थानिक पातळीवरील प्रयत्नांचा उल्लेख होता. देशभरातील अनेक प्रेरणादायी व्यक्ती आणि त्यांच्या कार्याबद्दल त्यांनी चर्चा केली. मा. पंतप्रधानांनी नव्या भारताच्या निर्मितीशी संबंधित आशा आणि अपेक्षांवर भर दिला. येत्या महिन्यातील ऑगस्ट क्रांती दिन, स्वातंत्र्य दिनसह अनेक उत्सव आणि आयोजनांबद्दलही त्यांनी आपले विचार मांडले.
यावेळी प्रशांत मुथा, सुहास पाथरकर, बाळासाहेब खताडे, उज्वला भांगे, सोनाली पाठक , उल्हास ढोरे, आदिनाथ येंडे कालिंदी केसकर,आनंद भळगट, सचिन पावले, बंटी बेंद्रे आदी उपस्थित होते .



