भरतशेठ शहा यांच्या वाढदिवसानिमित्त” इंदापूर श्री” भव्य जिल्हास्तरीय शरीरसौसंष्ट २०२४ स्पर्धेचे आयोजन…
भरतशेठ शहा यांच्या वाढदिवसानिमित्त” इंदापूर श्री” भव्य जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव २०२४ स्पर्धेचे आयोजन…
इंदापूर / विशेष प्रतिनिधी
इंदापूर: इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे हसतमुख व्यक्तिमत्व म्हणजे भरतशेठ शहा यांचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमातून संपन्न व्हावा या उद्देशाने भरतशेठ शहा मित्रपरिवार इंदापूर यांच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये भव्य जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा २०२४” इंदापूर श्री” ९ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित केली असून फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स पुणे यांच्या मान्यतेने व पुणे जिल्हा ख़ुशी शरीर संस्था संघटना यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये” इंदापूर श्री” विजेत्यास रोख रक्कम १५ हजार रुपये व चषक, तसेच ७० किलो वजन गट खालील विजेत्यास रोख ७ हजार रुपये व चषक बेस्ट ओझर रोख रक्कम ३००० व चषक मोस्ट विजेत्यास रोख रक्कम ३००० व चषक देण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील १ ते ५ विजयी स्पर्धकांना अनुक्रमे रुपये ५ हजार, ३ हजार, २ हजार, १ हजार रोख रक्कम मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. या स्पर्धेतील स्पर्धकांचे वजन तपासणी सोमवारी दि. ९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत शहा सांस्कृतिक भवन इंदापूर येथे होणार आहे. तरी सदर स्पर्धेमध्ये सहभागी घेण्याचे व स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन भरतभाऊ शहा मित्रपरिवार इंदापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.