Breaking
ब्रेकिंग

डॉक्टरांनी रुग्णांना जेनेरिक औषधे लिहुन द्यावीत

0 3 9 0 6 4

डॉक्टरांनी रुग्णांना जेनेरिक औषधे लिहुन द्यावीत

एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली, दि. ४ / डॉक्टरांनी रुग्णांना कोणत्याही विशिष्ट कंपनीची औषधे लिहून देऊ नयेत. तसेच डॉक्टरांनी रुग्णांसाठी फक्त जेनेरिक औषधे लिहून द्यावीत, असे आवाहन एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने केले आहे. सर्वोच्च न्यायालयापूर्वी राजस्थान उच्च न्यायालयानेही असाच निर्णय दिला होता. औषध कंपन्यांशी संबंधितएका याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. या याचिकेत औषध कंपन्यांवर मनमानी करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की जर हा निर्णय संपूर्ण देशात पाळला गेला तर त्यामुळे लक्षणीय सुधारणा होऊ शकते. डॉक्टरांवरही अनेकदा औषध कंपन्यांकडून लाच घेतल्याचा आरोप होणार नाही.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे