Breaking
ब्रेकिंग

भाई सथ्था नाईट हायस्कूल कबड्डी संघ ठरला उपविजेता

0 3 9 0 6 1

भाई सथ्था नाईट हायस्कूल कबड्डी संघ ठरला उपविजेता

प्रतिनिधी : संजय वायकर

दि. २८ डिसेंबर २०२४ रोजी पुणे येथे मासूम संस्थेच्यावतीने आंतर रात्र शालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रात्रशाळेत प्रवेशित विद्यार्थी वयाने मोठी असल्याने शालेय स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाही त्यामुळे क्रीडा स्पर्धेत असणारा आनंद रात्र शाळेतील विद्यार्थ्यांना मिळत नसल्याने मासूम संस्थेच्या वतीने क्रीडा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता या क्रीडा मेळाव्यात सांघिक मुलांसाठी कबड्डी, मुलींसाठी डॉजबॉल वैयक्तिक मध्ये मुला मुलींसाठी 100 मीटर,50 मीटर धावणे या स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या.नगर जिल्ह्यातून भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या एकमेव कबड्डी संघाने पुणे येथे सहभाग घेतला तसेच पुणे विभागातून आबासाहेब अत्रे रात्र प्रशाला व खडकी रात्रप्रशाला सहभाग नोंदवला.

सदर क्रीडा महोत्सवात मासूम चे NSTP विभागाचे सिनिअर प्रोग्राम हेड संदीप शेलार सर, प्रोग्राम हेड निलेश ठोंबरे सर, भाई सथ्था नाईट हायस्कूलचे मुख्याध्यापक व मासूम संस्थेचे सल्लागार समितीचे सदस्य मा. सुनील सुसरे सर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शिक्षक गजेंद्र गाडगीळ, बाळू गोरडे, कैलास करांडे, अशोक शिंदे उपस्थित कबड्डी स्पर्धेत अटीतटीचे सामने होऊन अहिल्यानगरच्या भाई सथ्था नाईट हायस्कूल ने उपविजेते करंडक मिळवला आहे. संघामध्ये अक्षय कोतकर ( कॅप्टन ), विशाल भोसले, प्रज्वल राजगुरू,आदित्य कुसमुडे, जुनेद पठाण, शहेबाज शेख,कुश कांबळे, धनंजय साठे,सागर साळवे ( उपकॅप्टन ),भावेश भिंगारदिवे या खेळाडूंनी सहभाग घेऊन नाईट हायस्कूलला उपविजेते पद मिळविल्याबद्दल सहभागी विद्यार्थी संघ व मार्गदर्शक शिक्षक बाळू गोरडे, कैलास करांडे, अशोक शिंदे यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, कार्याध्यक्ष अनंत फडणीस, मानद सचिव संजय जोशी, जेष्ठ मार्गदर्शक ब्रिजलालजी सारडा व अजितशेठ बोरा रात्रशाळेचे चेअरमन डॉ. पारस कोठारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ खडकी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ सदस्य व रात्रप्रशालेचे अध्यक्ष मा. रमेश अवस्थे सर, खडकी रात्रप्रशालेच्या मुख्याध्यापिका मा. अंजना कांबळे, खडकी शिक्षण संस्थेचे सहाय्यक शिक्षक अविनाश कोल्हे, पुणे ELC हेड सोमनाथ हुचगोळ सर, प्रोग्राम मॅनेजर नामानंद झांबरे व इतर शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी शिक्षक बाळू गोरडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

मुलांमधून कबड्डी च्या सामन्यामध्ये प्रथम क्रमांकाने खडकी रात्रप्रशाला, पुणे तर दुसऱ्या क्रमांकाने भाई सथ्था नाईट हायस्कूल, अहिल्यानगर आणि तिसऱ्या क्रमांकाने आबासाहेब अत्रे रात्र प्रशाला, पुणे विजयी झाले.
सदर क्रीडा मेळावा आयोजित केल्याबद्दल मासूम संस्था संचालिका निकिता केतकर, संचालक कमलाकर माने,युवराज बोराडे व मासूम संस्थेची सर्व टीम व विशेष या स्पर्धेच्या आयोजनासाठी आर्थिक मदत करणाऱ्या बजाज फिन्सर्व या कंपनीचे मासूम संस्थेचे सल्लागार सदस्य सुनील सुसरे यांनी आभार मानले.

3.5/5 - (4 votes)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे