Breaking
ब्रेकिंग

शिवसेनेने संधी दिल्यास प्रभाग चार मधून निवडणूक लढून जिंकणारच:- युवा सेना जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत राखुंडे

0 7 6 9 4 3

शिवसेनेने संधी दिल्यास प्रभाग चार मधून निवडणूक लढून जिंकणारच:- युवा सेना जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत राखुंडे

प्रतिनिधी: सूर्यकांत होनप

करमाळा: दि. २१/ माजी शिवसेना आमदार जयवंतराव जगताप, नगराध्यक्ष वैभव राजे जगताप, मार्केट कमिटीचे संचालक शंभूराजे जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग चार मध्ये मी विविध विकास कामे करून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी 24 तास सक्रिय असतो. यामुळे या प्रभागातून माझा विजय निश्चित असून, केवळ जयवंतराव जगताप यांचा आशीर्वाद मला विक्रमी मताने निवडून आणेल असा विश्वास प्रभाग चार मधील शिवसेनेचे इच्छुक उमेदवार युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख चंद्रकांत राखुंडे यांनी व्यक्त केला.

चंद्रकांत राखुंडे यांनी या मतदारसंघातून गेल्या वेळेस अपक्ष म्हणून नगरपालिकेची निवडणूक लढवली होती. त्यावेळेस त्यांना 330 मते मिळाली होती, तर विजयी उमेदवाराला 540 मते मिळाली होती. 210 मतांनी चंद्रकांत राखुंडे यांचा पराभव झाला होता. मात्र गेली सात वर्षापासून चंद्रकांत राखुंडे यांनी या प्रभागात अनेक कामे केली असून, सर्वसामान्यांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी वेळ दिला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली असून अनेक रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत. या प्रभागातील जवळपास 70 महिलांना बांधकाम कामगाराचा लाभ मिळवून दिला आहे. या प्रभागातील नागरिकांचे पोलीस स्टेशन तहसील कार्यालय आदी शासकीय कार्यालयातील प्रश्न सोडवण्यासाठी सदैव मदत केली आहे.

लहान मोठा गरीब श्रीमंत असा त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. रात्री अपरात्री कधीही कोणी कुठल्याही अडचणीत असेल तर एक फोन आणि चंद्रकांत राखुंडे मदतीस हजर अशी त्यांची ओळख आहे. आजपर्यंत चंद्रकांत राखुंडे यांनी वेगवेगळ्या पक्षाची वेगवेगळी पदे भूषवले आहेत परंतु त्या पदाचा सदैव जनसेवेसाठीच उपयोग करत आले. जिथे जनतेसाठी किंवा समाजासाठी काम करू शकत नाही किंवा पक्षाकडून मदत मिळत नाही अशा वेळेस त्यांनी त्या पदाचा त्यागही केलेला आहे. त्यामुळे चंद्रकांत राखुंडे हे वार्ड क्रमांक चार चे प्रबळ दावेदार आहेत असे म्हणण्यास हरकत नाही. वार्ड क्रमांक चार मधील नागरिक नक्कीच चंद्रकांत राखुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील व त्यांना प्रचंड मतांनी निवडून देतील.

सध्या चंद्रकांत राखुंडे हे प्रभाग चार मधील प्रबळ दावेदार म्हणून करमाळा शहरात चर्चेत नाव असून, त्यांच्या उमेदवारीला या प्रभागातील अनेक ज्येष्ठ, श्रेष्ठ नागरिकांनी पाठिंबा दिला आहे. या प्रभागातील जवळपास 100 नागरिकांना घेऊन शिवसेना माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी करणार असल्याची माहिती चंद्रकांत राखुंडे यांनी दिली आहे.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे