Breaking
ब्रेकिंग

नामाप्र आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिला आरक्षण नव्याने

जानेवारीत १३ ग्रामपंचायतींचे आरक्षण निघाल्याने प्रक्रिया चुकल्याने पुन्हा आरक्षण निघणार

0 3 9 0 6 1

नामाप्र आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिला आरक्षण नव्याने

जानेवारीत १३ ग्रामपंचायतींचे आरक्षण निघाल्याने प्रक्रिया चुकल्याने पुन्हा आरक्षण निघणार

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर : जानेवारी महिन्यात १३ ग्रामपंचायतींचे आरक्षण निघालेले होते अशाही ग्रामपंचायतीचा नव्याने काढण्यात आलेल्या आरक्षणात समावेश केला गेल्याने नामाप्र आणि सर्वसाधारण ग्रामपंचायतींचे महिला आरक्षण नव्याने २५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता नगरपालिका सभागृहात काढण्यात येणार आहे.ज्या ग्रामपंचायतींचे आधीच आरक्षण निघाले होते त्या ग्रामपंचायतींचे महिला आरक्षण काढताना परत समावेश झाल्याने मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९६४ मधील कलम (४)(५)(६) प्रमाणे कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे २५ रोजी पुन्हा नव्याने नामाप्र व सर्वसाधारण प्रवर्गातील महिला आरक्षण काढण्यात येईल. नामाप्र मध्ये एक आणि सर्वसाधारण प्रवर्गात पाच ग्रामपंचायतींच्या आरक्षणात फेरफार होऊ शकतो. तरी सर्व ग्रामस्थ आणि राजकीय पक्षाच्या सदस्यांनी आरक्षण सोडतीच्या वेळी उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे