Breaking
ब्रेकिंग

संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी येथे मकर संक्रातीनिमित्त प्रशालेतील पालक माता भगिनी यांचा हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा

0 3 9 0 4 0

संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी येथे मकर संक्रातीनिमित्त प्रशालेतील पालक माता भगिनी यांचा हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ३/ जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ शिराळ संचलित संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी येथे मकर संक्रातीनिमित्त प्रशालेतील पालक माता भगिनी यांचा हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्ष सौ. वंदना नंदकुमार टोणपे उपस्थित होत्या त्यांच्या शुभहस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी संजयमामा शिंदे विद्यालय भोगेवाडी च्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रियंका सावंत, संस्थेच्या विश्वस्त सौ. कल्पनाताई अनभुले तसेच पालक माता भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. त्यांचा सन्मान प्रशालेच्या वतीने करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रुक्‍मीन वाघमोडे, श्रीमती ज्योती खरात, श्रीमती रुक्मिन गायकवाड, श्रीमती वैशाली वाडेकर, श्रीमती साधना माळी तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले. याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नंदकुमार टोणपे सर, सचिव श्री रोहन टोणपे सर, कोषाध्यक्ष डॉ. रोहित टोणपे यांनी कौतुक केले‌. सदर उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे