Breaking
ब्रेकिंग

देऊळगाव रस्त्यावर उघड्यावर फेकला मुदत बाह्य औषधांचा साठा ; उडाली एकचं खळबळ

0 3 9 0 2 0

देऊळगाव रस्त्यावर उघड्यावर फेकला मुदत बाह्य औषधांचा साठा ; उडाली एकचं खळबळ

वाळकी / प्रतिनिधी : दादासाहेब आगळे

नगर तालुक्यातील गुंडेगाव ते देऊळगाव रोड लगत गिरवले वस्तीपासून ओढ्यात अगदी जवळचं मुदत बाह्य औषधांचा मोठा साठा रस्त्यावर फेकून दिलेल्या अवस्थेत काही दिवसापूर्वी आढळून आल्याने गिरवले वस्ती परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मागील काही दिवसापूर्वी नगर तालुक्यातील गुंडेगाव आणि देऊळगाव मार्गावरील गिरवले वस्ती,कासार मळा झरे वस्ती परिसरात असा मुदतबाह्य औषधांचा साठा फेकून दिलेल्या अवस्थेत निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली आहे.या भागात वारंवार असे प्रकार घडत असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यक्षमतेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार देऊळगाव गिरवले वस्ती च्या अगदी जवळचं रस्त्यावर हा मुदतबाह्य औषधांचा साठा पडल्याच स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर याची कल्पना त्यांनी पत्रकारांना दिली.
फेकून दिलेली औषधे ही वापराच्या बाहेर गेली आहेत. जनावरांच्या खाण्यात संपर्कात आल्यास किंवा एखाद्या मनुष्याने खाल्यास यापासून त्यांच्या आरोग्यास धोका पोहचू शकतो.हा साठा आरोग्य विभागाने पंचनामा करून नष्ट करावा असे नागरिकांचे म्हणणे असुन अन्न व औषध प्रशासन विभाग यावर कोणती कारवाई करणार? साठा कोणी टाकला? त्याचा शोध लागणार का?असे प्रश्न नागरिकांना पडले आहेत.
भविष्यातील असे प्रकार टाळण्यासाठी तालुक्यातील खाजगी रुग्णालय चालकांना देखील सूचना करण्यात याव व खाजगी रुग्णालयाचे बायोमेडिकल वेस्ट हे त्या त्या रुग्णालयाने निमावलीनुसार विल्हेवाट लावण्याबाबत सूचनाही द्याव्यात जेणे करून असे प्रकार होणार नाहीत.

 

गेल्या पंधरा दिवसांपासून गिरवले वस्ती जवळ पाच गोण्या भरुन औषधे, इंजेक्शन अशा अनेक मुदत संपलेला साठा टाकल्यामुळे सध्या होत असलेल्या पावसामुळे सदर साठा वाहुन विहीरीत शेतात आल्यामुळे तसेच दुर्गंधी सुटली आहे त्यामुळे आरोग्याचा धोका तयार झाला आहे.तसेच पाणी दुर्गंधीयुक्त झाल्यामुळे पिण्यास ही भिती वाटत आहे.यावर आरोग्य विभागाने कारवाई करण्याची गरज आहे.

पंडित गिरवले – देऊळगाव शेतकरी

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे