Breaking
ब्रेकिंग

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतीदिनानिमित्त नागरदेवळे येथे मोफत नेत्रतपासणी शिबीर

सावित्रीबाई फुले यांच्या कार्याने समाजात स्त्री सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा झाला -जालिंदर बोरुडे

0 8 6 6 5 2

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतीदिनानिमित्त नागरदेवळे येथे मोफत नेत्रतपासणी शिबीर

फिनिक्स सोशल फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम

सावित्रीबाई फुले यांच्या कार्याने समाजात स्त्री सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा झाला -जालिंदर बोरुडे

अहिल्यानगर / प्रतिनिधी : धीरज लांडगे

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनाच्या पार्श्‍वभूमीवर फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नगर तालुक्यातील नागरदेवळे येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. समाजातील गरजू नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण 317 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 67 गरजू रुग्णांवर दोन टप्प्यांत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी ह.भ.प. नाना महाराज रासकर, विलास शिंदे, आप्पा काळे, रवी ससाणे, अथर्व लोटके यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना जालिंदर बोरुडे म्हणाले की, स्त्री शिक्षणाची क्रांती घडवून महिलांना सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देण्याचे महान कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले. त्यांच्या विचारांमुळे समाजात स्त्री सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा झाला. तसेच शेतकरी व बहुजन समाजाच्या प्रश्‍नांना केंद्रस्थानी ठेवून महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुरोगामी विचार मांडले आणि सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केली. या महान वारशाला पुढे नेत वंचित घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचे काम फिनिक्स सोशल फाऊंडेशन करत असल्याचे त्यांनी सांगितले.

नागरदेवळे येथील संत सावता महाराज मंदिर परिसरात हे शिबिर पार पडले. तपासणीदरम्यान गरजू रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटपही करण्यात आले. तसेच फाऊंडेशनच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही ज्येष्ठ महिलांनी मरणोत्तर नेत्रदान व अवयवदानाचा संकल्प करत अर्ज भरून दिले. या उपक्रमामुळे समाजात अवयवदानाबाबत जनजागृती होण्यासही मदत झाली.

महिला दिनानिमित्त ज्येष्ठ महिलांचा सत्कार करुन यावेळी सन्मान करण्यात आला. शिबिर यशस्वी करण्यासाठी राजेंद्र बोरुडे, विशाल भिंगारदिवे, सौरभ बोरुडे, वैभव दानवे यांच्यासह फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 6 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे