राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अमळनेर भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अमळनेर भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर-:अखंड भारताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या न्यायप्रिय, प्रजावत्सल व राष्ट्रसेवेच्या प्रतीक असलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी (300वी) जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्ष, अमळनेरच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता अमळनेर बसस्थानकाजवळील राजमाता अहिल्यादेवी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी भाजप पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्मारकस्थळी अभिवादन करताना राजमातांच्या कार्याचा गौरव करण्यात आला यानंतर समाजहिताच्या दृष्टिकोनातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात भाजपा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपली व रक्तदानाच्या माध्यमातून राजमातांच्या “जनसेवेचा आदर्श” प्रत्यक्षात उतरवण्यात आला.
दुपारी कपिलेश्वर मंदिरात महाआरती चे आयोजन करण्यात आले. हे मंदिर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी स्वतःच्या प्रयत्नातून जीर्णोद्धार करून बांधलेले असल्यामुळे या स्थळाला विशेष ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व आहे. मंदिरात झालेली महाआरती, मंत्रोच्चार आणि भक्तिगीतांमुळे परिसर पावन झाला या कार्यक्रमांच्या माध्यमातून केवळ स्मृती जागवणं नव्हे तर राजमातांच्या आदर्शांचे नव्या पिढीपर्यंत प्रसारण करणे, हा भाजप अमळनेरचा उद्देश होता एक न्यायप्रिय, लोककल्याणकारी आणि धर्मप्रेमी राज्यकर्ती म्हणून त्यांच व्यक्तिमत्व आजही प्रेरणादायी आहे.राजमाता अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा जपणे हीच खरी अभिवादनाची पद्धत आहे हे या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे
कार्यक्रमात भाजपा प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष भैरवी वाघ पलांडे, खानदेश शिक्षण मंडळाचे माजी चेअरमन डॉ.अनिल शिंदे,ओबीसी मोर्चा प्रदेश भारती सोनवणे,जानवे मंडल अध्यक्ष जिजाबराव पाटील, पातोंडा मंडल अध्यक्ष राहुल पाटील,शहराध्यक्ष योगेश महाजन,माजी जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील,माजी नगरसेवक श्याम पाटील,पांडुरंग महाजन,विक्रांत पाटील, माजी शहर अध्यक्ष हरचंद लांडगे,खा शी संचालक माधुरी पाटील,अर्बन संचालिका वसुंधरा लांडगे,स्वपना पाटील,स्नेहा ऐकतारे,निळकंठ तात्या,सरचिटणीस राकेश पाटील,राहुल पाटील,रणजित पाटील, डी ए धनगर सर,मगन भाऊसाहेब,दिनेश माळी, विजय बाविस्कर,युवा मोर्चा देवा लांडगे,राहुल चौधरी,समाधान पाटील,कल्पेश पाटील, रितेश सोनवणे,हिरालाल पाटील, संजय पाटील, घनश्याम पाटील,प्रवीण पाटील,निखिल धनगर,अक्षय चव्हाण,दर्पण वाघ,अनिरुद्ध शिसोदे,अक्षय पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.