शांतीकुमारजी फिरोदिया अखिल भारतीय खुली आंतरराष्ट्रीय मानांकित बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
प्रतिनिधी : सूर्यकांत होनप
अहिल्यानगर : बुधवार ६ नोव्हेंबर पासून ते रविवार १० नोव्हेंबर पर्यंत अहिल्या नगरच्या सप्तक सदन, खिस्त गल्ली, मध्ये शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित व नगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित अखिल भारतीय खुली बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती नगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी दिली.
या स्पर्धेत भारतातून खेळाडू बुद्धिबळ खेळण्यासाठी येणार असून आत्तापर्यंत गुजरात, आंध्र प्रदेश, दिव, दमन, गोवा, तमिळनाडू इत्यादी राज्यातून दोनशेच्या वर खेळाडूंनी आपला प्रवेश निश्चित केला आहे.
इंटरनॅनल मास्टर विक्रमादित्य कुलकर्णी सह अनेक दिग्ज खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत असे अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
साडेपाच वर्षाचा सर्वात बाल खेळाडू तसेच ८३ वर्षाचे वयस्कर खेळाडू सुद्धा यात आपले बुद्धीचे बळ पणाला लावणार आहे असे सचिव यशवंत बापट यांनी सांगितले. रविवारी सकाळी ११.३० वाजता ही स्पर्धा सुरू होणार असून या स्पर्धेत एकूण ९ फेऱ्या होणार आहेत शेवटी रविवारी दुपारी दोन वाजता अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. या स्पर्धेत पंच शार्दुल तापसे (सांगली) अमरीश जोशी (संभाजी नगर) पवन राठी (पुणे) इ.असून त्यांना ४ सहाय्यक पंच सुद्धा मदत करणार आहेत.
नगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सदस्य सुबोध ठोंबरे, परूनाथ ढोकळे, शाम कांबळे, देवेंद्र ढोकळे, रोहित आडकर, मनीष जस्वनी,चेतन कड, प्रकाश गुजराती, नवनीत कोठारी आदी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. नगर शहरातील खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वरील स्पर्धेत अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी संपर्क:- यशवंत बापट. ९३२६०९२५०१ व पारूनाथ ढोकळे. ९८५०७०४२६८.