वैशाली वाडेकर राष्ट्रीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित
वैशाली वाडेकर राष्ट्रीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ४/
संजयमामा शिंदे विद्यालय कुर्डूवाडी येथील उपक्रमशिल शिक्षिका श्रीमती वैशाली वाडेकर यांना जीवन संघर्ष फाऊंडेशन बेळगाव यांचा मानाचा राष्ट्रीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. २५ जानेवारी २०२५ रोजी बेळगाव येथे माजी केंद्रीय कायदामंत्री रमाकांत खलप साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार मिळालेबद्दल जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ शिराळ चे संस्थापक श्री नंदकुमार टोणपे, सचिव श्री रोहन टोणपे, खजिनदार डॉ. रोहित टोणपे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रुक्मिणी वाघमोडे, सहकारी श्रीकांत सावंत सर, अतुल गोरे, पंडित अतकर, प्रवीण टोणपे व सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी वैशाली वाडेकर त्यांचे अभिनंदन व कौतुक केले. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून वैशाली वाडेकर यांना भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या व त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे. सर्वांनी वैशाली वाडेकर यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.