Breaking
ब्रेकिंग

आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे, भारतासकट अनेक देशात संघटित क्षेत्रातील रोजगाराच्या रस्त्यावर रक्तपात व्हायची भीती आहे

0 8 9 8 2 4

आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे, भारतासकट अनेक देशात संघटित क्षेत्रातील रोजगाराच्या रस्त्यावर रक्तपात व्हायची भीती आहे !

माहूर /प्रतिनिधी

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टी सी एस) ने, त्यांच्या जगभरात काम करणाऱ्या १२,००० कर्मचारी कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

अपेक्षेप्रमाणे कंपनीने सांगितले आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या वापरामुळे कमी मनुष्यबळाची गरज कंपनीला भासणार आहे. ही स्टँड अलोन बातमी असती तर एवढी गंभीर बनली नसती. दुर्दैवाने ती तशी नाही. कारण इतरही भारतीय आयटी कंपन्या कर्मचारी कपात करण्याच्या बातम्या आहेत.

भारताबद्दल आकडेवारी येईल. पण यंत्रे, सॉफ्टवेअर यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करणाऱ्या अमेरिकेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय परिणाम घडवत आहे यावरून, भारतातसकट इतर देशात या संदर्भात काय घडू शकते याचे अंदाज बांधायला मदत होऊ शकेल.
__________

(संदर्भ Moneycontrol Pro Panorama २८ जुलै)

जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत अमेरिकन टेक सेक्टर मध्ये लहान मोठ्या १७० कंपन्यांमध्ये ८०,००० प्रोफेशनलच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मायक्रोसॉफ्टने १५,००० कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. तर इंटेलने ५,००० !

हे झाले जानेवारी २०२५ पासून. २०२४ मधील १२ महिन्यात ५५० टेक कंपन्यात १,५०,००० कर्मचारी कपात केली गेली होती.

यातील बहुसंख्य पदे कंपनीतील मिडल मॅनेजमेंट आणि फ्रेश एन्ट्री लेव्हलमधील आहेत.

ज्या ठिकाणी त्याच त्याच प्रकारची कामे पुन्हा पुन्हा करण्यासाठी (रिपिटेटीव) मनुष्यबळ वापरले जाते ते जॉब्स धोक्यात आहेत. किंवा डेटा प्रोसेस करण्यासाठी मनुष्याच्या बुद्धीचा वापर अपेक्षित असतो असे जॉब्स.

त्यामुळे अमेरिकेत मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये पुढच्या दोन वर्षात २० लाख कमी कामगारांची गरज लागेल. तर वित्त आणि बँकिंग क्षेत्रात जेथे डेटा प्रोसेस होतो ते क्षेत्र देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाढवणार आहे. आता उपलब्ध असणाऱ्या एकूण नोकऱ्यांपैकी ३० टक्के नोकऱ्या २०३० पर्यंत कमी जास्त प्रमाणात धोक्यात येऊ शकतात. हे अंदाज MIT ने व्यक्त केले आहेत.
________________

हे इथेच थांबणारे नाही. नोकऱ्या गमावणारे बरेचसे मध्यम किंवा उच्चमध्यम वर्गातील असणार आहेत. ज्या कुटुंबाची क्रयशक्ती चांगली असते. नोकऱ्या गेल्यामुळे त्यांच्याकडून अर्थव्यवस्थेतील वस्तुमाल आणि सेवांना अर्थातच कमी मागणी असेल. अर्थव्यवस्थेतील एकूणच अनिश्चितता जाणवल्यामुळे ज्यांच्या नोकऱ्या टिकून असतील अशी कुटुंबे देखील खर्च करताना हात आखडता घेणार आहेत.

याचा विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेतील देशांतर्गत मागणीवर होणार. असा वस्तुमाल सेवा उत्पादित करणाऱ्या/ पुरवणाऱ्या उद्योगांमध्ये कामगार कपातीची लाट पोचू शकते. आहेत त्या उत्पादन क्षमता वापरल्या जात नाही आहेत हे बघून नवीन गुंतवणुकी करण्यासाठी उद्योजक पुढे येणार नाहीत.

भारतात तर संघटित क्षेत्रातील आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील नोकऱ्यांचा आधीच दुष्काळ. त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा तेरावा महिना येऊ घातला आहे….

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आक्रमणाचा धुरळा कितीतरी दिवस क्षितिजावर उडत आहे. तो आता जवळ येऊ लागला आहे. ज्यांच्यावर देशाची अर्थव्यवस्था व्यवस्थापनाची जबाबदारी आहे असे लोक कशात बिझी आहेत ?

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 8 2 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे