Breaking
ब्रेकिंग

हिवरगाव पावसा येथे रमजान ईद उत्सवात साजरी

सदिच्छांची देवाण घेवाण आणि सलोख्यासाठी मागितली दुआ

0 8 6 7 1 6

हिवरगाव पावसा येथे रमजान ईद उत्सवात साजरी

सदिच्छांची देवाण घेवाण आणि सलोख्यासाठी मागितली दुआ

संगमनेर प्रतिनिधी / नितीनचंद्र भालेराव 

हिवरगाव पावसा येथे रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली.सकाळी 9 वाजता ईदगह मैदानावर सर्व मुस्लिम बांधव एकत्रित जमा झाले.यावेळी मौलांना यांच्या नेतृत्वाखाली नमाजचे पठाण सर्व मुस्लिम बांधवांनी केले. या वेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.मुस्लिम समाजाचा रमजान महिना पवित्र असल्यामुळे मुस्लिम बांधव एकमेकांना गळाभेट घेत शुभेच्छा देत होते.तसेच हिंदू बांधवांनी ही रमजान ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.

महिन्याभराच्या कडक रोज्यानंतर ईदच्या दिवशी मुस्लीम समाज बांधवांनी एकत्र येत नमाज पठण केले.मनुष्य समाज हा गुण्यागोविंदाने राहावा,सर्वांना सु:ख,समृध्दी मिळावी,समाजात सलोख्याचे वातावरण अबाधित राहावे,अशी दुआ मागण्यात आल्याचे जुम्मा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष मन्सुर चाँदभाई इनामदार यांनी सांगितले.

रमजान हा मुस्लिम बांधवाचा पवित्र आणि उपवासाचा महिना म्हणून पाळला जातो.रमजान ईदला ‘ईद- उल- फित्र’ म्हटले जाते. या महिन्यांत 30 दिवस रोजे पाळणारे मुस्लिम बांधव ईदच्या दिवशी मस्जिदमध्ये सकाळी विशेष नमाज अदा करतात.हा अत्यंत सौहार्द आणि आनंदाचा दिवस मानला जातो. नवीन कपडे परिधान करून सर्वजण एकमेकांना आलिंगन देऊन ईद मुबारक देतात. शिरकुरमा,गोड पदार्थ करून हिंदू-मुस्लिम बांधवांना आमंत्रित केले जाते.

 

तसेच यावेळी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने अनुचित प्रकार घडू नये म्हणून तो चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.याप्रसंगी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी चव्हाण दादा उपस्थित
होते.यावेळी जुम्मा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष मन्सुर चाँदभाई इनामदार,उपाध्यक्ष नईम रफीक शेख,कोषाध्यक्ष अन्वर चॉदभाई इनामदार,पिरमोहम्मद चाँदभाई इनामदार,सचिव मोहम्मद इर्शाद हरुन शेख,कादरभाई बादशाहभाई पठाण
,इब्राहिम हसन शेख,
नसिर म्हमु पठाण,
सोहेब सलिम शेख,
रमजान बेगूभाई पठाण,जावेद हसन शेख यांच्या सह हिवरगाव पावसा येथील मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव,
सरपंच सुभाष गडाख,उपसरपंच सुजाता दवंगे,राजहंस दूध संघाचे संचालक डॉ.प्रमोद पावसे,
भाजपा माजी तालुका अध्यक्ष काशिनाथ पावसे,कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव,जेष्ठ संपादक यादवराव पावसे,देवगड देवस्थानचे अध्यक्ष तथा वृक्षमित्र प्रा.गणपत पावसे,सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे,भाजपा तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे,शिवसेना मागासवर्गीय सेल जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भालेराव, वि.वि.कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक अशोक भालेराव,जय मल्हार दूध संस्थेचे चेअरमन डॉ.संदिप पावसे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष डॉ.विजय पावसे,पोलिस पाटील मथाजी पावसे,सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक नारायण पावसे, बाळासाहेब भालेराव,
बच्चन भालेराव,दीपक भालेराव,
राजेश भालेराव,शरद भालेराव,
विकास दरोळे,सोमनाथ दवंगे,संजय भालेराव,विशाल भालेराव,महेंद्र भालेराव,चंद्रकांत भालेराव,सागर भालेराव,सुयोग भालेराव,संतोष भालेराव, संजय भालेराव,गौतम भालेराव ,मुकेश भालेराव,लहानु भालेराव,
समधान भालेराव,विकास गडाख,प्रविण गडाख, भीमाशंकर पावसे,यादव भालेराव यांच्या सह
कला सम्राज्ञी पवळा कला मंच,
भीमशक्ती तरुण मित्र मंडळ व हिवरगाव पावसा येथील सर्व संस्था पदाधिकारी,कार्यकर्ते,
ग्रामस्थ यांनी शुभेच्छा दिल्या.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 1 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे