Breaking
ब्रेकिंग

शहरात अवकाळी पाऊसाची वादळासह हजेरी ; सर्वसामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत

0 8 6 5 3 0

*शहरात अवकाळी पाऊसाची वादळासह हजेरी ; सर्वसामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत*

जळगाव जिल्हा प्रतिनिधी :- पंकज पाटील

जळगाव :- अमळनेर शहरासह तालुक्यात २ रोजी सायंकाळी 5:00 वाजेपासुन अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अमळनेर शहरात शिरुड रस्ता कडे जाताना जिनिंंग मध्ये मोठ्या प्रमाणावर मक्का आलेला होता,त्याठीकाणी त्यांचे पण नुकसान झाले. शहरातील या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.बाजारातील व्यावसा यिकांची चांगलीच तारबंळ
उडाली.शहरासह खेड्यातील विद्युत तारा पडून वीज पुरवठा खंडित झाला
पाऊस आल्याने शेतातील परिपक्व मका ,, बाजरी, ज्वारी आदि पिके आडवी पडून नुकसान झाले. तसेच वावडे, मांडळ, चिमणपुरी पिंपळे, वाघोदे आदी भागातही जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. मका, ज्वारी पिके आडवी झाली काही शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला मका देखील पावसात भिजल्याने नुकसान झाले आहे.वादळ आणि पावसाने नुकसान झाले आहे. वादळाने ज्वारी मका आडवे पडले आहेत. जायची कापणी झाली होती त्यांच्या चाऱ्याचेही नुकसान झाले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे