Breaking
ब्रेकिंग

करमाळा नगरपरिषद निवडणूक ;जगताप गट ऍक्टिव्ह मोडवर, इच्छुकांच्या भेटीचा ओघ वाढला

नगराध्यक्ष पदासाठी सौ नंदिनीदेवी जगताप यांच्यासह अर्ध्या डझनहून अधिक महिलांच्या नावाची चर्चा 

0 7 6 9 4 3

करमाळा नगरपरिषद निवडणूक ;जगताप गट ऍक्टिव्ह मोडवर, इच्छुकांच्या भेटीचा ओघ वाढला

नगराध्यक्ष पदासाठी सौ नंदिनीदेवी जगताप यांच्यासह अर्ध्या डझनहून अधिक महिलांच्या नावाची चर्चा 

करमाळा (विशेष प्रतिनिधी सचिन जव्हेरी)

आगामी करमाळा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जगताप गट प्रचंड ऍक्टिव्ह मोडवर असल्याचे दिसून येत आहे . इच्छुकांकडून माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या कडे भेटीचा ओघ वाढला असून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या कार्यकर्तेआपली इच्छा व्यक्त करू लागले आहेत . तसेच आपल्या उमेदवारीच्या सक्षम पणाचे व योग्यतेचे दाखले देत आहेत .नगराध्यक्ष पदासाठी माजी आमदार जगताप यांच्या पत्नी सह जवळपास अर्धा डझन हुन अधिक महिलांची नावे चर्चेत आहेत .नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर सध्या मतदार यादी अंतिम होणेकडे वाटचाल सुरू आहे .तसतसे इच्छुक उमेदवारांच्या हालचालींचा वेग ही वाढला आहे .इच्छुक उमेदवार आपल्या समर्थकांसह माजी आमदार जगताप यांची भेट घेऊन आपल्या उमेदवारीची दावेदारी करत असल्याचे चित्र जगताप गटात दिसत असल्यामुळे सध्या करमाळा शहरात जगताप गट प्रचंड ऍक्टिव्ह मोडवर आल्याचे दिसत आहे .नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी जाहीर झाले व त्यानंतर माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी सौ नंदिनीदेवी जगताप यांचे नाव चर्चेत आले .दस्तर खुद्द माजी आमदार जगताप यांच्या धर्मपत्नीचे नाव चर्चेत आल्यानंतर शहरातील राजकीय माहोल जगताप गटासाठी प्रचंड अनुकूल झाल्याचे व सकारात्मक बदल झाल्याचे तीव्रतेने जाणवत आहे .त्यामुळे प्रभाग निहाय इच्छुकांचा ओढ जगताप गटाकडे वाढला आहे .जगताप गटातून नगराध्यक्ष पदासाठी सौ नंदिनीदेवी जयवंतराव जगताप यांचे सह अग्रक्रमाने माजी नगरसेविका संगीता श्रेणीककुमार खाटेर,श्रीमती वंदना नारायण ढाळे, माजी नगरसेवक अल्ताफ तांबोळी यांच्या पत्नी सौ शबाना अल्ताफ तांबोळी,माजी उपनगराध्यक्ष ॲड कमलाकर वीर यांच्या पत्नी सौ स्वाती कमलाकर वीर ,माजी नगराध्यक्षा सौ पुष्पा हनुमंत फंड, सौ विद्या विलास चिवटे,माजी नगरसेविका सौ शारदा बाळनाथ राखुंडे यांची नावे चर्चेत आहेत .परंतु कुटुंबातील महिलेला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी द्यायची कि पार्टीतील अन्य एखाद्या सक्षम महिलेला उमेदवारी द्यायची याचा अंतिम निर्णय माजी आमदार जगतापच घेणार आहेत .माजी आमदार जगताप यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा व निर्णयाचा थांग पत्ता त्यांनी जाहीर करेपर्यंत कोणालाच लागत नाही हे त्याहून आणखी विशेष .त्यामुळे आगामी काळातील माजी आमदार जगताप यांचे निर्णयाकडे सर्व शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे .

 

माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आजपर्यंत करमाळा तालुक्यात राजकारण केले पण कधीही त्यांनी विरोधासाठी विरोध करणे हे धोरण कधीही अवलंबिले नाही. उलट ज्यांची संस्था आहे तिथे आपण हस्तक्षेप करणे त्यांनी हमेशा नाकारले आहे.याला संपुर्ण तालुका साक्षीला आहे. करमाळा अर्बन बॅक असो,मकाई सह.साखर कारखाना असो हे ज्वलंत उदाहरण असल्याचे मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे