Breaking
ब्रेकिंग

न्यू इंग्लिश स्कूल, वाळकी विद्यालयात किशोरवयीन मुलींना समुपदेशन

0 8 6 7 0 2

न्यू इंग्लिश स्कूल, वाळकी विद्यालयात किशोरवयीन मुलींना समुपदेशन 

 वाळकी /  प्रतिनिधी : दादासाहेब आगळे 

अहिल्यानगर तालुक्यातील वाळकी येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल,कनिष्ठ महाविद्यालयात किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य आणि आत्मसन्मान, प्रसारमाध्यमांचा सुयोग्य वापर व स्वसंरक्षण याबाबत एक दिवसीय समुपदेशन व प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
       समुपदेशन प्रशिक्षणात डॉ अमृता देवचके (पोस्ट ग्रॅज्युएशन इन क्लीनिकल सायकॉलॉजी, को.ओनर ऑफ ग्लोबल डायग्नोस्टिक सेंटर ) यांनी मार्गदर्शन केले . याअंतर्गत प्रसारमाध्यमांचा वापर आणि प्रसार माध्यमांचे फायदे – तोटे विविध उदाहरणांसह मुलींना समजतील अशा भाषेत स्पष्ट केले. मुलींनी स्वतःच्या आरोग्याची स्वतः काळजी कशी घ्यायची हे स्पष्ट केले. किशोरवयीन मुलींना “गुड टच बॅड टच” याविषयी अतिशय सोप्या व साध्या भाषेत मार्गदर्शन केले. 
  प्राचार्य विकास कोकाटे, उपप्राचार्य भरत कासार ,पर्यवेक्षक प्रदीप गारुडकर, ज्येष्ठ शिक्षिका भारती मगर आदींनीही मार्गदर्शन केले.शिक्षिका शितल लबडे,अपेक्षा खेंगट,अर्चना दिवटे ,स्वामिनी चौधर,रोहिणी चोभे,सुप्रज्ञा झांजेकार्यक्रम यशस्वी साठी यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सविता जावळे यांनी केले तर रईसा तांबोळी यांनी आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 0 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे