तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी येथील सौ. वैशाली वाडेकर तालुक्यात प्रथम
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी येथील सौ. वैशाली वाडेकर तालुक्यात प्रथम
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ४/ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी येथील सौ. वैशाली वाडेकर यांनी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. रोपळे येथे झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये शिक्षक गटातून वैशाली वाडेकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. गणितीय संकल्पना व पर्यावरण या प्रयोगास तालुक्यातून प्रथम क्रमांक देण्यात आला. त्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली. या यशाबद्दल जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ शिराळ चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री नंदकुमार टोणपे, संस्थेचे सचिव श्री रोहन टोणपे, संस्थेचे सदस्य डॉ. श्री रोहित टोणपे, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रुक्मीन वाघमोडे, तसेच संस्थेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.



