पंडित दीनदयाळ उपाध्याय हिरकमहोत्सव जिल्हास्तरीय वत्कृत्व व पोस्टर सादरीकरण स्पर्धेत आडसूळ पॉलिटेक्निकला प्रथम क्रमांक*
*पंडित दीनदयाळ उपाध्याय हिरकमहोत्सव जिल्हास्तरीय वत्कृत्व व पोस्टर सादरीकरण स्पर्धेत आडसूळ पॉलिटेक्निकला प्रथम क्रमांक*
प्रतिनिधी : संवेद वायकर
अहिल्यानगर चास, पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त शासकीय तंत्रनिकेतन, अहिल्यानगर या ठिकाणी आयोजित केलेल्या वत्कृत्व, निबंध व पोस्टर सादरीकरण स्पर्धेत जिल्ह्यातील इंजिनिअरिंग, पॉलीटेक्निक व फार्मसी महाविद्यालयांनी भाग घेतला होता. जिल्ह्यातील ४२ पेक्षा जास्त महाविद्यालयांनी सहभाग नोंदवल्याने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ही भुषावह बाब आहे, असे प्रतिपादन पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सवी वर्ष समितीचे सदस्य विनायक देशमुख यांनी केले.या स्पर्धेसाठी आडसूळ पॉलीटेक्निक मधील प्रथम वर्ष सिव्हिल इंजिनिअरिंग मधील विद्यार्थिनी कु. अलिशा पठाण हिने ‘एकात्म मानव दर्शन -पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांची मूलभूत संकल्पना’ या विषयावर वत्कृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवला तर तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मधील कु.गटकळ साक्षी व कु.साळुंखे सिद्धी यांनी पोस्टर सादरीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. यावेळी समितीचे सदस्य राजाभाऊ मुळे, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.अजय आगरकर, परीक्षिका प्रा.शुभांगी कुंभार, प्रा. आश्लेषा भांडारकर, प्रा. सीमा आगरकर उपस्थित होते.
प्राचार्य श्री रमेश एस गडाख म्हणाले की, महाविद्यालयीन स्तरावर करून घेतलेल्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले व त्यांनी त्याचे रूपांतर हे जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्तुंग यश संपादन करून दाखवले. त्याबद्दल त्यांचे खूप खूप कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अनिरुद्ध आडसूळ म्हणाले, पंडित दीनदयाळ यांनी आपले आयुष्य राष्ट्राच्या उन्नतीसाठी समर्पित केले. तरुणांनी त्यांचे विचार समजुन घेऊन आपल्या जीवनात त्याचा अंगीकार करावा. या माध्यमातूनच स्वतःची व राष्ट्राची प्रगती होईल आणि देश विश्व् गुरु बनेल. या प्रसंगी संस्थेच्या सचिव सौ. लिनाताई आडसूळ, डायरेक्टर श्री. कृष्णा आडसूळ, खजिनदार मा. श्री. परमेश्वर आडसूळ, सदस्या कल्पना आडसूळ व रत्न आडसूळ तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम. पाटील व पॉलीटेक्निकचे प्राचार्य गडाख आर. एस. यांनी देखील विद्यार्थ्यांचे कौतुक करत, शुभेच्छा दिल्या. या नेत्रदीपक यशाबद्दल सर्व विभाग प्रमुख,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.



