भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हात मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश
*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हात मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश*
जिल्हा प्रतिनिधी :- पंकज पाटील
जळगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर जयंतीनिमित्त १४ रोजी जिल्ह्यातील सर्व प्रकारची किरकोळ मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जारी केले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
पोलीस अधीक्षक यांच्या विनतीनुसार महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ मधील कलम १४२ (१) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्तीधारकांनी आपले
व्यवहार पूर्णपणे बंद ठेवावेत. यामध्ये सीएल-३ (देशी मद्य किरकोळ विक्री), एफएल-२/सीएल/एफएल/टिओडी-३ (विदेशी व देशी किरकोळ विक्री), एफएल-३ (परमिटरूम), एफएल/बिआर-२ (बिअर शॉपी) तसेच टीडी-१ (ताडी दुकाने) या सर्व परवानाधारकांचा समावेश आहे.
आदेशाचे उल्लघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. संबंधितानी आदेशाची नोंद घेऊन त्याचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




