Breaking
ब्रेकिंग

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात निर्भया पथकाचे मार्गदर्शन; महिलाविषयक कायदे मुलींना भयमुक्त बनवतात:-पो. कॉ. मंगेश पवार

0 7 6 9 4 7

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात निर्भया पथकाचे मार्गदर्शन; महिलाविषयक कायदे मुलींना भयमुक्त बनवतात:-पो. कॉ. मंगेश पवार

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २७/ करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये मोटार वाहन विषयक कायदे व महिलांविषयक कायदे यासंदर्भात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या विषयावर पो. कॉ. मंगेश पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मनोगतातून कायद्याविषयक सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली‌. सध्याच्या काळामध्ये मोबाईलमुळे विद्यार्थी नैतिकतेपासून दूर जाताना दिसत आहे. त्यामुळे मुलींनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे. त्यासाठी करमाळा पोलीस ठाण्यात निर्भया पथक स्थापन केलेले आहे त्याचा मुलींनी फायदा घेतला पाहिजे व आपले संरक्षण केले पाहिजे. तसेच वाहन विषयक कायदे आणि आपली जबाबदारी, वाहन परवान्याचे महत्व या विषयी माहिती दिली.

पो. कॉ. विद्या इंगोले यांनी कायद्याविषयक माहिती देऊन फक्त विद्यार्थिनींशी एकांतात संवाद साधून महत्त्वाचा कानमंत्र दिला. अध्यक्षीय समारोपतून डॉ. ए. पी. माने यांनी मुलींनी कोणत्याही मोहाला बळी पडू नये. आपल्या वडिलांची मान खाली झुकेल अशे चुकीचे वर्तन कदापी करु नये. आज घरी गेल्यावर वडिलांचा हात घट्ट पकडून ‘पप्पा माझ्या वर कायम विश्वास ठेवा, मी तुमच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही’ असा त्यांना शब्द द्या. फक्त शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे असे अवाहन केले.

या कार्यक्रमासाठी पोलीस हवालदार संभाजी पवार, निर्भया पथकाच्या विद्या इंगोले मॅडम, आय क्यू ए सी चे समन्वयक डॉ. अंकुश करपे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी हजर होते. हा कार्यक्रम अंतर्गत तक्रार निवारण समिती व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष या विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेफ्ट. डॉ. विजया गायकवाड यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. विष्णू शिंदे, व प्रा. रुपाली थोरात यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. सुधीर मुळीक यांनी मानले.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे