Breaking
ब्रेकिंग

नगर तालुका भाजपच्या वाळकी – चिचोंडी पाटील कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी संतोष भापकर यांची निवड.,

0 8 6 6 6 2

नगर तालुका भाजपच्या वाळकी – चिचोंडी पाटील कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी संतोष भापकर यांची निवड. . .

गुंडेगाव / प्रतिनिधी : दादासाहेब आगळे

नगर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वाळकी – चिचोंडी पाटील मंडळ कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी गुंडेगाव येथील माजी उपसरपंच संतोष भापकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे . ही नियुक्ती आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या उपस्थितीत देण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष गहिननाथ दरेकर यांनी भापकर यांना औपचारिकरित्या नियुक्तीपत्र प्रदान केले.
भाजपच्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड विशेष महत्त्वाची मानली जात आहे.माजी उपसरपंच संतोष भापकर यांच्यावर पक्षाने सोपवलेली ही जबाबदारी त्यांच्या नेतृत्वगुण व कार्यकर्तृत्वाची पावती आहे.
संतोष भापकर हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असून, त्यांनी गावाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे वाळकी – चिचोंडी पाटील मंडळासह संपूर्ण तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे.

यावेळी गुंडेगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार व अभिनंदन करण्यात आले. उपस्थितांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 6 6 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे