पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड ने दिल्ली येथे सन्मान
पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड ने दिल्ली येथे सन्मान
प्रतिनिधी : – पंकज पाटील
चोपडा :- येथील पंकज शैक्षणिक आणि सामाजिक संस्था, संचलित पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा *मा. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांता मजुमदार आणि भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री. महावीर सिंघवी* यांच्या उपस्थितीत आणि *सुप्रीम कोर्टाचे मा. न्यायमूर्ती दिपक वर्मा* यांच्या हस्ते दिल्ली येथे आयोजित भव्य समारंभात ऐज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.
सदर अवॉर्ड साठी संस्थाध्यक्ष डॉ सुरेश बोरोले व मुख्याध्यापक व्ही आर पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते.
या पुरस्कारासाठी संपूर्ण भारतातील नामांकित शाळांचे परीक्षण विविध मुद्द्यांच्या आधारे करण्यात आले. त्यात विशेषकरून संस्थेतील संचालक मंडळ यांनी शालेय गुणवत्तेसाठी उपलब्ध करून दिलेल्या भौतिक सुविधा, मागील पाच वर्षांची विद्यार्थी संख्येचा वाढता आलेख, शून्य टक्के विद्यार्थी गळती, महिला सक्षमीकरण साठी राबविलेले उपक्रम, विद्यार्थी सुरक्षा, सीसीटीव्ही कॅमेरा वापर, शालेय गुणवत्ता, शाळेने राष्ट्रीय एकात्मतेसाठी केलेले कार्य, स्वच्छतेसाठी शाळेने केलेले प्रयत्न, शाळेने राबविलेले वृक्षारोपण कार्यक्रम, शाळेतील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेतील यश, इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेमधील निकाल व गुणवत्ता, रात्र अभ्यासिका, शिक्षकवृंदाची अध्यापनाची पद्धती व प्रशिक्षणे, एन ई पी 2020 बद्दल शाळेने राबविलेले विविध उपक्रम, आधुनिक तंत्रज्ञानाचा शाळेने केलेला वापर व सहभाग इत्यादी नुसार शाळांची निवड करण्यात आली.
या पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून 5 शाळांची निवड करण्यात आली होती. त्यात नॉन मेट्रो गृप मधून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या गटात *पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या एकमेव शाळेची गौरवास्पद निवड करण्यात येऊन दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले.
एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड साठी निवड झाल्याबद्दल केंद्रीय शिक्षण राज्य मंत्री डॉ. सुकांत मजुमदार यांनी संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक आणि कर्मचारीवर्ग यांच्या ऊत्कृष्ट कार्याबद्दल गौरवोद्गार काढले आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश पंडित बोरोले, उपाध्यक्ष अविनाशदादा राणे, संचालक पंकजभैया बोरोले, नारायण दादा बोरोले, सर्व संचालक मंडळ, सर्व शाखांचे विभाग प्रमुख यांनी पंकज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही आर पाटील, शिक्षक व कर्मचारीवृंद यांचे अभिनंदन केले.