Breaking
ब्रेकिंग

संकट समयी जेष्ठ नागरिकांनी ११२ डायल करावा- पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम

सायबर क्राईम जनजागृतीने वृद्ध झाले सायबर साक्षर

0 3 9 0 6 9

संकट समयी जेष्ठ नागरिकांनी ११२ डायल करावा- पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम

सायबर क्राईम जनजागृतीने वृद्ध झाले सायबर साक्षर

वि.उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर : जेष्ठ नागरिकांना कोणी टवाळखोर त्रास देत असेल किंवा काही गैरप्रकार झाला तर ११२ डायल करा किंवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधा , अनोळखी व्हाट्सएप व्हिडीओ कॉल घेऊ नका असे आवाहन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी जेष्ठ नागरिकांना सायबर गुन्ह्यांबाबत जागृत करण्यासाठी घेतलेल्या कार्यशाळेत केले._सोशल मीडियातून फसवणूक होणाऱ्यात जेष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे. पोलीसांतर्फे सायबर गुन्ह्यांची जनजागृती करण्यात येत आहे. पू सानेगुरुजी जेष्ठ नागरिक मंडळाच्या भवनात पोलीस स्टेशनतर्फे २७ रोजी सकाळी सायबर क्राईम जागृती कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू शिवाजीराव पाटील होते. प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सांगितले की आमच्या पोलीस स्टेशनचे डिजिटल अरेस्ट हा प्रकार नाही , सोशल मीडियावर टास्क देऊन तुम्हाला काही रक्कम बक्षीस देऊन नन्तर लुबाडले जाते त्यामुळे त्याला बळी पडू नका. बऱ्याचदा ओटीपी मागितला जातो त्याबाबत जागृत व्हा. काही संकट आले किंवा कोणी त्रास देत असेल तर ११२ डायल केल्यास १५ मिनिटात पोलिसांची मदत मिळेल. मोबाईल हाताळताना काय करावे आणि काय करू नये याबाबत पोलीस निरीक्षक निकम यांनी सखोल माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील म्हणाले की पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाने जेष्ठ वृद्ध नागरिक सायबर साक्षर झाले. आमच्या मनातील भीती दूर होऊन दिलासा मिळाला. जगाचे ज्ञान असावे मात्र ए आय सारख्या तंत्रज्ञानाचा अतिवापर घातक ठरू शकतो. यावेळी जेष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील यांना साहित्य भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर राजेंद्र नवसारीकर , एस एम पाटील ,उमाकांत नाईक , कृष्णा पाटील , श्रावण पाटील हजर होते.

कार्यक्रमास भाऊराव पाटील , देविदास बिरारी , पवार , श्रीमती चौधरी , प्रा शिवाजी पाटील , नारायण पाटील ,ए डी पाटील , प्रकाश पाटील , हेमंत पाटील, वाघ यांच्यासह १५० जेष्ठ नागरिक हजर होते. सूत्रसंचालन राजेंद्र नवसारीकर तर आभार एस एम पाटील यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे