नगरपरिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांना सन्मानाने निरोप*

*नगरपरिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांना सन्मानाने निरोप*
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- अमळनेर नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता डिगंबर वाघ यांची चोपडा नगरपरिषदेत तर आरोग्य विभागाचे स्वछता निरीक्षक संतोष बिऱ्हाडे यांची धरणगाव नगरपलिकेत बदलीनिमित्त त्यांना सन्मानाने निरोप देण्यात आला.सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी तुषार नेरकर होते.यावेळी काँट्रॅक्टर महावीर पहाडे,मा नगरसेवक घनश्याम पाटील,माजी नगरसेवक मनोज पाटील,पत्रकार संजय पाटील ,अनंत निकम यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून दोन्ही अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले.सतत क्रियाशील राहून या अधिकाऱ्यांनी शहरासाठी विशेष योगदान दिले असल्याने शहरवासीयांच्या ते नेहमीच स्मरणात राहतील अश्या भावना सर्वानी व्यक्त केल्या.मुख्याधिकारी नेरकर यांनी असे चांगले अधिकारी या पालिकेला लाभलेत यामुळे शहरात बांधकाम व आरोग्य विभागाकडून चांगली कामे होऊ शकली.असे सांगत त्यांनी केलेल्या कार्याला उजाळा दिला.यावेळी वाघ आणि बिऱ्हाडे यांनी सत्काराला उत्तर देताना अमळनेरकरानी विशेष प्रेम आम्हाला दिले असून येथील कारकीर्द आम्ही मुळीच विसरू शकणार नाहीत, हा सत्कार आमचा उत्साह वाढविणारा असल्याचे त्यांनी सांगत सर्वांचे ऋण व्यक्त केले.यावेळी त्यांचा पालिकेतर्फे भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.तर नव्याने रुजू झालेले करनिर्धारण अधिकारी विनोद पाटील व नगर रचना सहाय्यक मुकुंद बागुल यांचा मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी उपमुख्याधिकारी रविद्र चव्हाण,पाणीपुरवठा अभियंता अमोल बैसाने,अभियंता सुनील पाटील, अजित लांडे,लेखापाल शामनाणी,विद्युत अभियंता,लेखा परीक्षक कृनाल कोष्टी,सहायक मिळकत व्यवस्थापक महेश जोशी,आरोग्य निरीक्षक कंदारे,कर निरीक्षक रवींद्र लांबोळे,प्रसाद शर्मा तसेच पत्रकार संघटनेचे अध्यक्ष चेतन राजपुत, पत्रकार किरण पाटील,आर जे पाटील,शेखा मिस्तरी,माजी नगरसेवक,शहरातील राजकीय आणि सामाजिक पदाधिकारी, कॉन्ट्रॅक्टर,पालिका कर्मचारी व सफाई कामगार आणि नागरिक उपस्थित होते.सूत्रसंचालन सोमचंद संदानशिव यांनी केले.