भारतीय प्रशासत्ताक दिनानिमित्त गयाबाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था व हॅपी माईंड हॅपी हेल्थ फिटनेस अकॅडमी तर्फे फ्री फिटनेस कॅम्पचे आयोजन
भारतीय प्रशासत्ताक दिनानिमित्त गयाबाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था व हॅपी माईंड हॅपी हेल्थ फिटनेस अकॅडमी तर्फे फ्री फिटनेस कॅम्पचे आयोजन
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २१/ भारतीय प्रजासत्ताक दिन अमृत महोत्सव वर्षानिमित्त गयाबाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था करमाळा व महारष्ट्र हॅपी माईंड हॅपी हेल्थ फिटनेस अकॅडमी तर्फे आयोजित फ्री फिटनेस कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. करमाळा शहरात नगरपरिषदेच्या प्रशस्त माननीय जयवंतराव जगताप सभागृहात या फिटनेस कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 26 जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता या उपक्रमाचे उद्घाटन होईल.
दि. 27 ते 29 जानेवारी पर्यंत फिटनेस कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम करमाळा येथील प्रसिद्ध समाजसेवक किसन कांबळे सर, अध्यक्ष असलेल्या गयाबाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने आणि हॅप्पी माईंड हॅप्पी हेल्थ फिटनेस अकॅडमी चे अध्यक्ष फिटनेस कोच, करमाळा भूषण पुरस्काराने सन्मानित आणी इतर अनेक प्रकारच्या पुरस्काराने सन्मानित विक्रमवीर महेश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे. वयोगट 7 ते 75 यातील सर्व मुले, मुली, स्त्री, पुरुष यात सहभाग घेऊ शकतात.
व्यायामा सर्वांनाच माहीत असतो पण त्याचे शास्त्र आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यायाम केला तर त्याचे अनेक फायदे आपल्याला होतात आणि आपण सशक्त आणि निरोगी राहते. व्यायाम आज जीवनाचा अविभाज्य भाग आहे असे स्पष्ट मत प्रशिक्षक महेश वैद्य यांनी व्यक्त केले. गयाबाई बहुउद्देशीय सामाजिक संस्था अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवीत असते त्याचाच एक भाग म्हणून हा फिटनेस कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. तरी याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे मत संस्थेचे अध्यक्ष किसन कांबळे सर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाची वेळ सकाळी 6 ते 8:30 आणि संध्याकाळी 4:30 ते 7 अशी असेल. महिलांसाठी स्वतंत्र बॅच आहे. तरी आपले शरीर निरोगी सशक्त ठेवण्यासाठी या प्रशिक्षण वर्गाचा सर्वांनी लाभ घ्यावा.