Breaking
ब्रेकिंग

साई रत्न” पुरस्काराने चार विद्यार्थिनींचा गौरव

0 8 6 5 2 1

*“साई रत्न” पुरस्काराने चार विद्यार्थिनींचा गौरव*

प्रतिनिधी :- पंकज पाटील

अमळनेर :- साई इंग्लिश अकॅडमि, अमळनेर तर्फे आयोजित विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार व प्रतिष्ठेचा “साई रत्न” पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. एम. जे. हॉल येथे आयोजित या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.संदीप घोरपडे सर होते, तर श्री. भाऊसाहेब देशमुख आणि सौ. प्रतिभा मगर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली.या प्रसंगी मृणल पाटील, कल्याणी पाटील आणि विष्णू सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. पालकांतर्फे सौ. शीतल मोरे मॅडम आणि श्री. नितीन भदाणे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
या सोहळ्यात १३३ हून अधिक यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यंदाचा अत्यंत प्रतिष्ठेचा आणि प्रेरणादायी “साई रत्न” पुरस्कारकल्याणी संदीप पाटील, गार्गी सुनील जोशी, घनिका प्रशांत मालुसरे आणि लिनाली प्रमोद ठाकरे यांना प्रदान करण्यात आला.
सातत्याने शाळेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या नेहा राकेश पाटील हिला विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भैय्यासाहेब मगर (संचालक, साई इंग्लिश अकॅडमि) यांनी केले. सूत्रसंचालन प्रियंका बारी हिने उत्कृष्टरीत्या पार पाडले, तर रीचल पाटील हिने आभार मानले.
साई इंग्लिश अकॅडमिच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नव्या उंचीवर झेप घेण्याची निश्चितच प्रेरणा मिळत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे