Breaking
ब्रेकिंग

गुंडेगाव बीएसएनएल टॉवर ठप्प — ग्रामस्थांचा संपर्क तुटला!*

_वीजपुरवठा खंडित झाला की टॉवर बंद; नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय_

0 8 6 7 2 2

*गुंडेगाव बीएसएनएल टॉवर ठप्प — ग्रामस्थांचा संपर्क तुटला!*

_वीजपुरवठा खंडित झाला की टॉवर बंद; नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय_

गुंडेगाव प्रतिनिधी :- गुंडेगाव परिसरातील बीएसएनएल मोबाईल टॉवर गेल्या काही दिवसांपासून बंद पडल्याने गावातील नागरिक संपर्क विहीन झाले आहेत. नेटवर्क नसल्यामुळे मोबाईल क्रमांक ‘नॉट रिचेबल’ दाखवत असून, नागरिक, शासकीय कर्मचारी तसेच व्यावसायिक वर्ग त्रस्त झाला आहे. गावातील एकमेव बीएसएनएल टॉवर वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर पूर्णपणे बंद पडतो. टॉवरवरील बॅटरी बॅकअप निकामी झाल्याने काही मिनिटांतच सिग्नल गायब होतात. त्यामुळे आपत्कालीन प्रसंगी फोनद्वारे संपर्क साधणे अशक्य बनते.
शेतीसंबंधी शासकीय योजना, विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण, तसेच शासकीय अधिकारी वा नातेवाईकांशी संपर्क साधताना मोठ्या अडचणी येत आहेत. मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे डिजिटल व्यवहार, युपीआय पेमेंट्स आणि ऑनलाईन बँकिंगही ठप्प झाले आहे. या समस्येमुळे आपत्कालीन प्रसंगीही मदत मागवता येत नाही. त्यामुळे बीएसएनएल विभागाने तातडीने दखल घेऊन वीजपुरवठा खंडित झाल्यासही टॉवर सुरू राहील, अशी बॅकअप व्यवस्था करावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.व बीएसएनएल प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीने टॉवर दुरुस्त करून नेटवर्क सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

“ *बीएसएनएल टॉवर सुरू असला की संपर्क व्यवस्थित राहतो, पण वीज गेली की सिग्नल गायब होतात. आजच्या डिजिटल युगात ही मोठी समस्या आहे. बीएसएनएल प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी.*
प्रदीप शिवाजी भापकर, ग्राहक गुंडेगाव .

4/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे