Breaking
ब्रेकिंग

अल्पवयीन अल्तमश शेख याचा कडक उन्हाळ्यातील रोजा पूर्ण

0 7 6 9 4 4

अल्पवयीन अल्तमश शेख याचा कडक उन्हाळ्यातील रोजा पूर्ण

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १९/ पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहरातील खाटिक गल्लीतील अल्पवयीन मुलगा अल्तमश अशपाक शेख (घोणे) याने कडक उन्हाळ्यातील रोजा (उपवास) पूर्ण करून एक आदर्श घातला आहे. अल्तमश याने श्रद्धा आणि जिद्दीने कडक उन्हाळ्यातील रोजा पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शहरातील अल्तमश शेख याने एक दिवसाचा रोजा पूर्ण केला आहे.

अल्पवयातही धार्मिक आस्था आणि संयम जपत अल्तमश याने दिवसभर उपवास पूर्ण केला. त्याच्या या जिद्दीमुळे परिसरात कौतुक करण्यात येत आहे. लहान वयात इतका संयम राखणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे.

कुटुंबियांच्या मार्गदर्शनाखाली आई व वडील अशपाक शेख यांच्याकडे त्याने रोजा ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने संयमाने आई वडिलांच्या छायेत रोजा पूर्ण केला. रमजान महिना हा संयम, त्याग आणि प्रार्थनेचा संदेश देणारा मानला जातो. या पवित्र महिन्यात दाखवलेली श्रद्धा आणि चिकाटी ही इतरांसाठी प्रेरणादायी आहे.

अल्तमश याने जामा मशीद मध्ये रोजा इफ्तार केला आहे. यावेळी मौलाना अन्वर शेख, इस्रायल शेख, इम्रान शेख, अफजल शेख आदि उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे