Breaking
ब्रेकिंग

भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट ऑप क्रेडीट सोसायटी लिमीटेड मध्ये गैरव्यहार प्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपीस केले जेरबंद

एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी

0 3 9 0 9 3

भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट ऑप क्रेडीट सोसायटी लिमीटेड मध्ये गैरव्यहार प्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपीस केले जेरबंद

एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी

जिल्हा  प्रतिनिधी :  महेश चव्हाण

अहिल्यानगर दि 2/09/2024 रोजी फिर्यादी नामे रोहीदास सदाशिव जाधव वय 74 वर्ष धंदा- शेती रा.जेउर ता.जि.अहिल्यानगर यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, दिनांक 04/08/2022 ते दिनांक 26/08/2024 रोजी पावेतो वेळोवेळी यातील मुख्य आरोपी नामे भारत बबन पुंड रा. बेलपिंपळगाव ता. नेवासा जि. अहिल्यानगर व त्याचे साथीदार यांनी कट कारस्थान रचुन फिर्यादी व 350 पेक्षा जास्त ठेविदारांचा विश्वास संपादन करुन त्यांचे मल्टीस्टेट सोसायटीमध्ये चालु व बचत खाते उघडुन त्यांचेत रोख रकमा जमा करुन जास्त व्याज दर देतो रकमा दामदुप्पट देतो असे आमीष दाखवुन ठेविदारांचे रोख रकमाचे ठेवी घेवुन डेली कलेक्शन द्ववारे रोख रकमा जमा करुन घेतल्या. त्यानतंर ठेवीदार यांनी त्यांचे पैशाची मागणी केली असता आरोपी नामे भारत बबन पुंड रा. बेलपिंपळगाव ता. नेवासा जि. अहिल्यानगर व इतर सहकारी यांनी 21 कोटी रुपयापेक्षा जास्त ठेवी लाभासह परत फेड न करता त्यांनी कपटपुर्व रितीने कसुर करुन त्यांचा विश्वास घात करुन आर्थिक फसवुन केली व भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीची जेउर येथील शाखा बंद करुन फसवुन केली वैगेरे मचकुराचे फिर्यादीवरुन एम.आय.डी.सी. पोस्टे गु.रजि. नंबर 667/2024 B.N.S.2023 चे कलम 316 (5), 318 (3),318(4), 61(2) सह MPID कायदा कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास करत असतांना सपोनि माणिक चौधरी यांना गोपनिय व तांत्रिक विश्लेषणाचे अधारे माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील मुख्य आरोपी नामे भारत बबन पुंड रा. बेलपिंपळगाव ता. नेवासा जि. अहिल्यानगर हा पंढरपुर या ठिकाणी लपुवन बसला आहे. त्यावरुन एमआयडीसी पोस्टे चे पथक तयार करुन सदर पोलीस पथकाने पंढरपुर या ठिकाणी जावुन आरोपीस सापळा लावुन ताब्यात घेतले. त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव भारत बबन पुंड वय- 33 वर्ष रा. बेलपिंपळगाव ता. नेवासा जि. अहिल्यानगर असे सांगीतले. सदर आरोपीस गुन्हयात दिनांक 02/12/2024 रोजी 00/34 वा. अटक
करण्यात आली असुन पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक माणिक चौधरी हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा.श्री. राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री. प्रशांत खैरे सो. अपर पोलीस अधीक्षक सो अहिल्यानगर, श्री. संपतराव भोसले सो उपविभागीय पोलीस अधिकारी सो नगर ग्रामीण विभाग अहिल्यानगर यांचे मार्गदर्शानाखाली सपोनि माणिक बी. चौधरी प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन पोसई जाधव, पोहेकॉ नितीन उगलमुगले, पोहेकॉ/ राजेंद्र सुद्रीक, पोकॉ/किशोर जाधव, पोकॉ/ सुरज देशमुख दक्षिण मोबाईल सेल अहिल्यानगर चे पोकॉ राहुल गुड्डू यांचे पथकाने केली आहे

1/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 9 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे