Breaking
ब्रेकिंग

अतिवृष्टी ग्रस्त भागाच्या पाहणीसाठी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट करमाळा दौऱ्यावर : माजी आमदार जयवंतराव जगताप यांची माहिती 

0 8 6 6 5 2

अतिवृष्टी ग्रस्त भागाच्या पाहणीसाठी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट करमाळा दौऱ्यावर : माजी आमदार जयवंतराव जगताप यांची माहिती 

करमाळा (विशेष प्रतिनिधी सचिनजव्हेरी)

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट बुधवार २५ सप्टेंबर रोजी करमाळा दौऱ्यावर येत असून तालुक्यातील अतिवृष्टीने व पूरस्थितीने नुकसान झालेल्या भागांची पाहणी करणार असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करून शासनाला अहवाल सादर करण्यासाठी येणार असल्याची माहिती शिवसेनेचे करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी दिली .याविषयी अधिक माहिती देताना माजी आमदार जगताप यांनी सांगितले की,सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट अतिवृष्टीने व पूरस्थिती निर्माण झालेल्या संगोबा,पोथरे, बिटरगाव , आवाटी . . . आदी भागांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत .तसेच करमाळा शहरांमध्ये शिवसेना शाखेचे उद्घाटन व त्यानंतर करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवारामध्ये चालू असलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन , लोकार्पण व भव्य शेतकरी मेळावा मार्केट यार्ड मधील भाजी मंडई येथील रयत भवन मध्ये सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या शुभहस्ते सांगोल्याचे माजी आमदार शहाजी (बापू ) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आमदार नारायण (आबा ) पाटील , उपमुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे ,जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीतआयोजित करण्यात आला असल्याची माहिती माजी आमदार जगताप यांनी दिली .सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे ,माजी नगराध्यक्ष वैभव आबा जगताप,जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांचे सह शिवसेना व जगताप गटाचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत .मार्केट यार्ड मधील शेतकरी मेळाव्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन बाजार समितीच्या उपसभापती सौ शैलजा मेहेर यांनी केली आहे .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 6 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे