जय भवानीगड विकास प्रतिष्ठान, संस्थेतील विध्यार्थ्यांचे राष्ट्रीय पातळीवरील कुराश स्पर्धेत घवघवीत यश तसेच राष्ट्रीय पातळीवर निवड
जय भवानीगड विकास प्रतिष्ठान, संस्थेतील विध्यार्थ्यांचे राष्ट्रीय पातळीवरील कुराश स्पर्धेत घवघवीत यश तसेच राष्ट्रीय पातळीवर निवड
इंदापूर / विशेष प्रतिनिधी
इंदापूर : क्रीडा व युवक सेवा संचानालय महाराष्ट्र राज्य ,अंतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कुराश स्पर्धा एस बी पाटील पब्लिक स्कूल रावेत पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी संपन्न झाल्या. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्हाच्या विभागातून विविध शाळेतील खेळाडूनी सहभाग नोंदवला असून त्यामध्ये,प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल तसेच विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी मधील १४ वर्ष १७ वर्ष १९ वयोगटतील मुली व मूले यांनी नेत्रदीपक कामगिरी बजावली.
१४ वर्ष वयोगट मुली
१) पलक काळे ३२ किलो
(प्रथम क्रमांक)
२) समृद्धी जाधव (पी आय एस )२४ किलो
( द्वितीय क्रमांक )
३)प्रतीक्षा ढोले ४८किलो
( द्वितीय क्रमांक)
४) राजनंदनी नरुटे २८किलो
(सहभाग)
१७ वर्ष वयोगट मुली
सीनियर चॅम्पियनशिप
१) सानिका माने ४८किलो
( तृतीय क्रमांक)
१९ वर्ष वयोगट मुली
१) श्रेया मुडके. ६३किलो
( प्रथम क्रमांक)
२) प्रिया वाघमोडे ७०किलो
( प्रथम क्रमांक)
१४ वर्षे वयोगट मुले
१)युद्धवीर गायकवाड ५५+
(सहभाग)
वरील प्रथम क्रमांकच्या खेळाडूंची राष्ट्रीयस्तरावर रायपूर येते स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.
या नेत्रदीपक कामगिरी बद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले,
उपाध्यक्षा सौ.चित्रलेखा ढोले, सचिव हर्षवर्धन खाडे, मुख्य सल्लागार प्रदिप गुरव तसेच प्राचार्य . राजेंद्र सरगर ,संस्थेचे प्रशासक/प्राचार्य गणेश पवार यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच यांना क्रिडा विभाग प्रमुख प्रशिक्षक शिवराज तलवारे .अविनाश कोकाटे यांचे मार्गदर्शन लाभले. यांचेही संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.