कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी डॉ. टिपरसे यांचा अनुभव उपयोगी पडेल – डॉ. उद्धव शिंदे
नूतन पोलीस उप अधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांचे 'स्नेहबंध' तर्फे स्वागत
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी डॉ. टिपरसे यांचा अनुभव उपयोगी पडेल – डॉ. उद्धव शिंदे
नूतन पोलीस उप अधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांचे ‘स्नेहबंध’ तर्फे स्वागत
प्रतिनिधी : संवेद वायकर
अहिल्यानगर – अहिल्यानगर शहराच्या शिस्तबद्ध व कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी डॉ. टिपरसे यांचा अनुभव व कार्यपद्धती निश्चितच उपयोगी पडेल, असे प्रतिपादन स्नेहबंध सोशल फौंडेशनतर्फे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले.
नूतन पोलीस उप अधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांचा स्नेहबंध फौंडेशनतर्फे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी रोप देऊन स्वागत व सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते.
नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असलेले डॉ. टिपरसे हे २०१७ बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात छत्रपती संभाजीनगर येथून केली. त्यानंतर तुळजापूर, परभणी व गंगाखेड येथे यशस्वीपणे पोलीस सेवेत कार्य करत त्यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता त्यांची नियुक्ती अहिल्यानगर येथे झाली आहे.
‘स्नेहबंध’ चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, अहिल्यानगर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी डॉ. टिपरसे यांचा अनुभव व कार्यपद्धती निश्चितच उपयोगी पडेल. त्यांच्या कार्यकाळात नागरिकांना पोलीस प्रशासनावर अधिक विश्वास मिळेल.


