Breaking
ब्रेकिंग

पिंपरी अवघड जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सवासह विविध कार्यक्रम

0 8 6 6 6 2

पिंपरी अवघड जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सवासह विविध कार्यक्रम

राहुरी तालुका /  प्रतिनिधी : जावेद शेख

जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्वांगीण विकासाचे मार्गदर्शन पहिले पाऊल उपक्रमात बालपणापासूनच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी
आपण स्पर्धेच्या युगामध्ये राहत आहोत. शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय प्रवेश परीक्षा इत्यादी स्पर्धा परीक्षेची प्राथमिक शाळेतच तोंड ओळख विद्यार्थ्यांना होत असते त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याची व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांची बालपणापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करावी असे प्रतिपादन प्रहारचे अध्यक्ष माजी सरपंच श्री.सुरेशराव लांबे यांनी केले.

दि. १६ जून रोजी जिल्हा परिषद शाळा पिंपरी अवघड तालुका राहुरी येथे प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी प्रभात फेरी काढून मान्यवरांच्या हस्ते मोफत गणवेश, पाठ्यपुस्तक, शूज वाटप करून नवागतांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करून श्री शिवाजी नवाळे सर यांना आदर्श पुरस्कार देण्यात आला शेवटी वृक्षारोपणाचा कार्यक्रम करन्यातआला या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे मा.अध्यक्ष श्री.पोपटराव शेंडगे होते शेंडगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मुलांना व शिक्षकांना अमोल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून युवा उद्योजक या.सरपंच श्री.बापुसाहेब पटारे,मा.सरपंच सौ परविनबानो शेख,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ योगिता लांबे सदस्य जालिंदर पवार,विजय पवार, सौ.सुलताना पठाण,सौ.सोनाली उमाप,बद्रीनाथ लांबे,सनी पटारे,दादासाहेब लांबे,ढोकणे,व शिक्षक गण श्री शिवाजी नवाळे सर,श्री मच्छिंद्र नागटीळक सर,सौ.संगीता बेंद्रे मॅडम, सौ.ज्योती पुरी मॅडम, कु अश्विनी लांबे मॅडम, सौ.चंद्रकला मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी पहिलीत प्रवेश पात्र २३ विद्यार्थ्यी व पालक तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री गंगाधर जवरे सर यांनी तर सूत्रसंचालन श्री अनिल कल्हापुरे सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन श्री पवार सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

3/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 6 6 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे