सभासद, ठेवीदारांच्या विश्वासामुळेच ‘प्रेरणा’चा वाढता आलेख
सभासद, ठेवीदारांच्या विश्वासामुळेच ‘प्रेरणा’चा वाढता आलेख
राहुरी तालुका जावेद शेख
सभासद आणि ठेवीदारांच्या अखंड विश्वासामुळेच प्रेरणा उद्योग समूहाचा आलेख सतत उंचावत आहे, असे प्रतिपादन प्रेरणा उद्योग समूहाचे संस्थापक सुरेश वाबळे यांनी केले.
गुहा येथील प्रेरणा संस्थेच्या डॉ. दादासाहेब तनपुरे सभागृहात प्रेरणा मल्टीस्टेट, प्रेरणा पतसंस्था व प्रेरणा ग्रामीण विकास सोसायटीच्या सभासदांना लाभांश वाटप सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, संचालक, कर्मचारी आणि सर्व शाखांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात संस्थापक सुरेश वाबळे म्हणाले की, “प्रेरणा संस्थांनी स्थापनेपासूनच सभासद व ठेवीदारांचा विश्वास जपण्याला प्राधान्य दिले आहे. पारदर्शक कामकाज, नेतृत्व आणि सेवा हीच प्रेरणाची ओळख ठरली आहे. सभासदांना लाभांश वाटप करणे ही फक्त आर्थिक बाब नाही, तर तो संस्थेच्या प्रामाणिक कार्याचा आणि परस्पर विश्वासाचे प्रतीक आहे.
या प्रसंगी प्रेरणा मल्टीस्टेटचे चेअरमन सुजित वाबळे, व्हा. चेअरमन प्रा. वेणूनाथ लांबे, प्रेरणा पतसंस्थेचे व्हा. चेअरमन मच्छिंद्र हुरुळे, प्रेरणा ग्रामीण विकास सोसायटीचे व्हा. चेअरमन व डॉ. तनपुरे साखर कारखान्याचे संचालक अशोक उर्हे तसेच प्रा. विशाल वाबळे, राजेंद्र गांडुळे, जालिंदर वरपे, विष्णुपंत वर्पे, भाऊसाहेब उर्हे, अशोक आंबेकर, भास्करराव इरोळे, शरद वाबळे,शौकत सय्यद, मारुती लांबे, अशोक सौदागर, सुनील उरहे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रेरणा मल्टीस्टेटचे व्यवस्थापक अनिल वर्पे, जनरल मॅनेजर श्री. चंद्रे, तसेच सर्व शाखांचे व्यवस्थापक, अधिकारी आणि कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.



