इंग्लिश गुरु अकॅडमीच्या विद्यार्थीनींचा इंग्रजीमध्ये प्रथम रँक*

*इंग्लिश गुरु अकॅडमीच्या विद्यार्थीनींचा इंग्रजीमध्ये प्रथम रँक*
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
पारोळा :- पारोळा येथील इंग्लिश गुरु अकॅडमीच्या आनलाईन बॅचमधून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी तनुजा दीपक जाधव हिने बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयात पहिला क्रमांक मिळवून एक अभिमानास्पद कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे तनुजा ही कला शाखेची विद्यार्थिनी असूनही तिने इंग्रजी विषयात उत्कृष्ट यश संपादन केले आहे.तिच्यासह जागृती प्रकाश पाटील हिनेही इंग्रजी विषयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या दोघी विद्यार्थिनीनी दाखवलेली गुणवत्ता व कष्ट खरोखरच प्रेरणादायक आहे. या यशामागे इंग्लिश गुरु अकॅडमीचे प्रा. कांतीलाल पाटील सर यांचे मार्गदर्शन आणि शिस्तबद्ध अध्यापनशैली यांचा मोठा वाटा आहे. इंग्रजीसारखा विषय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक ठरत असतानाही या विद्यार्थिनीनी अभ्यासाच्या जोरावर आणि सरांच्या प्रेरणेमुळे हे यश मिळवले आहे. प्रा. कांतीलाल पाटील सरांनी विद्यार्थिनीचा विशेष सत्कार करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “शिक्षण हे केवळ गुणांसाठी नसून आत्मविश्वास निर्माण करण्याचे साधन आहे. अशा विद्यार्थ्यांनी इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे.इंग्लिश गुरु अकॅडमी गेली अनेक वर्षे गुणवत्तापूर्ण इंग्रजी शिक्षण देण्यासाठी झटत आहे. त्यांच्या कार्याची ही यशस्वी फलश्रुती आहे.ही कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी असून, इंग्लिश गुरु अकॅडमीच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब.