कराटे राष्ट्रीय पंचांची जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे भेट; मनपा कराटे स्पर्धा अधिकृत पंचांच्या उपस्थितीत घेण्याची मागणी !
कराटे राष्ट्रीय पंचांची जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे भेट; मनपा कराटे स्पर्धा अधिकृत पंचांच्या उपस्थितीत घेण्याची मागणी !
एस डब्ल्यू न्यूज रिपोर्ट
अ .नगर : शहरात होणाऱ्या मनपा स्तरीय शालेय कराटे स्पर्धा पारदर्शक, निष्पक्ष आणि अधिकृत दर्जाची व्हावी, यासाठी Karate India Organization (K.I.O.) चे राष्ट्रीय पंचांनी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे यांची अहमदनगर येथे भेट घेतली.
या भेटीत पंचांनी स्पष्टपणे मांडले की, स्पर्धेचा दर्जा टिकवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीला न्याय मिळवून देण्यासाठी स्पर्धा ही केवळ K.I.O. चे अधिकृत राष्ट्रीय पंचांच्या उपस्थितीतच आयोजित केली जावी. यामुळे केवळ खेळाडूंना योग्य संधी मिळेल असे नाही, तर स्पर्धेचे निकाल देखील पारदर्शक आणि विश्वासार्ह ठरतील.
जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे यांनी या मागणीचे गांभीर्य लक्षात घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी आश्वासन दिले की, मनपा कराटे स्पर्धा अधिकृत पंचांच्या मार्गदर्शनाखालीच पार पडेल आणि यापुढे कराटे संघटनांमध्ये समन्वय ठेवून कार्यवाही केली जाईल.
या चर्चेदरम्यान राष्ट्रीय पंच आदित्य क्षीरसागर, सरफराज सय्यद, सुरज गुंजाळ, सबिल सय्यद आणि साहिल सय्यद उपस्थित होते. पंचांनी स्पर्धेच्या आयोजनासंबंधी तांत्रिक बाबी, नियमावली, सुरक्षा आणि विद्यार्थ्यांच्या शिस्तीबाबतही सविस्तर चर्चा केली.
कराटे क्षेत्रातील पारदर्शकता, खेळाडूंचा आत्मविश्वास आणि स्पर्धेचा दर्जा टिकवण्यासाठी अधिकृत पंचांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सर्वांनी मान्य केले. या बैठकीमुळे येणारी मनपा स्तरीय शालेय कराटे स्पर्धा अधिक शिस्तबद्ध, आणि सुरळीत पातळीवर पार पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला .


