मा.राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त “अहिल्याभवन” येथे आरोग्यम महिला योगा सेंटरचे भव्य उद्घाटन.*
*मा.राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त “अहिल्याभवन” येथे आरोग्यम महिला योगा सेंटरचे भव्य उद्घाटन.*
राहुरी तालुका जावेद शेख
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान,राहुरी.यांनी मा.राज्यमंत्री प्राजक्त दादांच्या वाढदिवसानिमित्त केला.
डॉक्टर माने मेडिकल फाउंडेशन, एस बीआय फाउंडेशन ,आरोग्यम योगा सेंटर, बुधरानी हॉस्पिटल पुणे यांच्या वतीने भव्य शिबिराचे उद्घाटन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या *अध्यक्षस्थानी अकोला बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार लक्ष्मणराव तायडे* हे होते.
प्रमुख पाहुणे राहुरीच्या *माजी नगराध्यक्ष डॉ सौ उषाताई तनपुरे माजी राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे* जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रामदास बाचकर,माजी उपसभापती बाळासाहेब खुळे,डॉ तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक किसनराव जवरे,गणेश गाडे, विवेकानंद नर्सिंग होम चे उपाध्यक्ष भारत वारुळे सर,सामनाचे पत्रकार राजेंद्र वाडेकर,नगरसेविका संगीता आहेर,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रभाकर आप्पा गाडे,बापूसाहेब गागरे पतंजली योग समितीचे अध्यक्ष बापूसाहेब निमसे,मधुकर निमसे, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष कोंडीरामजी वडीतके,अशोकराव विटनोर,सौ सोनालीताई राका,राष्ट्रवादी युवक अध्यक्ष ज्ञानेश्वर बाचकर,चंद्रगिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब विटनोरआदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी खासदार प्रसाद रावजी तनपुरे साहेब यांनी प्रतिष्ठानच्या या सर्व उपक्रमाला भेट देऊन प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती घेतली व उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या. डॉ सौ उषाताई तनपुरे यांच्या शुभहस्ते फीत कापून योगा सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांच्या शुभहस्ते राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सर्व मान्यवरांचा सत्कार औषधी वनस्पती देऊन करण्यात आला. सर्व पाहुण्यांचे स्वागत वावरत चे माजी सरपंच प्रतिष्ठानचे सचिव ज्ञानेश्वर बाचकर यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रास्तविकामध्ये प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय तमनर यांनी सांगितले की प्राजक्त दादा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्या भवनचे उभारणीचे काम सुरू आहे.
वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड,
मुलांसाठी अभ्यासिका, महिलांसाठी योगा सेंटर ,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र ,विविध शासकीय योजनेची माहिती विविध घटकांपर्यंत पोहोचविणे ,दर महिन्याला नेत्र तपासणी शिबिर ,कॅन्सर निदान शिबिर ,विविध समाज उपयोगी उपक्रमांची माहिती दिली. महापुरुषांच्या जयंती,पुण्यतिथी साजऱ्या करून त्यांचा इतिहास भावी पिढीला समजावून सांगणे अशा विविध शासकीय योजनांची माहिती या निमित्ताने दिली. योगा सेंटरच्या प्रमुख सौ योजनाताई लोखंडे यांनी सांगितले की अहिल्याभवन येथे सुरू होणाऱ्या महिला योगा सेंटरच्या माध्यमातून महिलांच्या अनेक गंभीर समस्या समजावून घेऊन शरीराबरोबर मनाचा सुद्धा व्यायाम करून घेण्यात येईल यासाठी सर्व महिला भगिनींनी आपला सहभाग नोंदवावा .आपले आरोग्य उत्तम राहिले तर आपण कुटुंब सांभाळू शकतो .आपले आरोग्य आपल्या हाती आहे .यासाठी दोन्ही हातामधील वेगवेगळ्या बिंदूचे महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी उपस्थितांना दिली .त्यांच्या या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाने संपूर्ण सभागृह गहिवरून गेले. त्याचबरोबर प्राजक्त दादांचा वाढदिवसाविषयी त्यांनी सांगितले की बाळ जन्माला येताना आईचा पुनर्जन्म होतो .परंतु सगळ्यांचेच बाळाकडे लक्ष राहते. आणि आईकडे दुर्लक्ष होते .अर्थात आई म्हणजेच डॉ सौ उषाताई तनपुरे यांनी प्राजक्त दादांच्या रूपाने कर्तृत्व संपन्न असा हिरा या राहुरीकरांना दिला. त्याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक केले. डॉक्टर माने मेडिकल फाउंडेशन अध्यक्ष डॉ स्वप्नील माने यांनी एसबीआय फाउंडेशनच्या माध्यमातून अद्यावत कॅन्सर निदान फिरते सेंटर अहिल्या भवन येथे महिन्यातून एकदा तपासणीसाठी आणणार आहोत .यात महिलांच्या गर्भाचा कॅन्सर तोंडाच्या कॅन्सरचे निदान या ठिकाणी होईल व वाढदिवसानिमित्त उपचार व औषधे मोफत दिली जाणार आहे. डॉ सौ उषाताई ताई तनपुरे यांनी वाढदिवसानिमित्त सुरू केलेल्या उपक्रमाविषयी बुधरानी हॉस्पिटल पुणे ,डॉ माने मेडिकल फाउंडेशन, आरोग्यम योगा सेंटर यांचे आभार मानले व अहिल्यादेवी प्रतिष्ठानच्या कार्याची प्रशंसा केली. दरम्यानच्या काळामध्ये राहुरी नगर मनमाड रस्त्यावरील तालुक्यातील अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम प्राजक्त दादा यांनी रद्द केले होते. परंतु अहिल्या भवन येथे कार्यक्रमासाठी दादा उपस्थित राहिले दादांच्या शुभहस्ते अहिल्या भवान येथे वृक्षारोपण करण्यात आले .राहुरी शहरातील व तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती .परंतु दादांनी तालुक्यातील दुःखद घटना विषयी वार्तालाप केला व सर्वच उपस्थितांच्या वतीने सर्व मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा देताना माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या जुन्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला आज स्वतःचा वाढदिवस बाजूला ठेवून तालुक्याच्या दुःखाचा विचार करतो असा नेता प्राजक्त तनपुरे यांना भविष्य काळामध्ये राज्याच्या राजकारणात मोठी संधी मिळणार आहे असे सुतोवच केले .कार्यक्रमाचे आभार कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रामदास बाचकर यांनी मानले.सूत्रसंचालन अनिलजी डोलनर यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय तमनर योगा सेंटरच्या प्रमुख सौ योजना लोखंडे सौ मनीषा वासकर,ज्ञानेश्वर बाचकर, अनिल डोलनर,दादाभाऊ तमनर,दत्ताभाऊ खेडेकर,भारत मतकर,बाबासाहेब केसकर,भाऊसाहेब विटनोर,कैलास केसकर,आप्पा सरोदे,श्रीकांत बाचकर,भारत विटनोर सर,आबा काळनर,संदीप तमनर,विनोद काळनर, अनिल माने,इंजि.किशोर तमनर,सुखदेव बलमे,सौ मनीषा पोटे डॉक्टर माने मेडिकल फाउंडेशन चे बाळासाहेब सगळगिळे आदींनी प्रयत्न केले.
बुधराणी हॉस्पिटल पुणे, यांच्यावतीने 270 नेत्र तपासणी तर 60 रुग्णांना चष्मे वाटप 13 रुग्ण शस्त्रक्रियासाठी पुणे येथे रवाना.एस.बी.आय फाउंडेशन व डॉ माने मेडिकल फाउंडेशन यांच्यावतीने 350 रुग्ण तपासणी 3 रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया तसेच औषधी वृक्ष लागवड व नगर मनमाड हायवे वरील मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण असा आदर्श उपक्रम


